"हिरो हिरोईनचे दिवस आता संपले"; Cannes गाजवणाऱ्या छाया कदम यांचं मोठं वक्तव्य
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री छाया कदम या कान फिल्म फेस्टिव्हलमधील कामगिरीमुळे चर्चेत आहेत. त्यांनी सिनेमातील हिरो हिरोईन यांच्याविषयी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
advertisement
1/7

सैराट, न्यूड, लापता लेडीज सारख्या अनेक मराठी तसंच हिंदी सिनेमा आणि वेब सीरिजमधून आपल्या अभिनयाची ताकद दाखवून देणाऱ्या अभिनेत्री छाया कदम सध्या कान फिल्म फेस्टिव्हलमुळे चर्चेत आहेत.
advertisement
2/7
सातासमुद्रापार कानमध्ये मराठीचा झेंडा गाजवणाऱ्या छाया कदम यांनी सिनेमातील हिरो हिरोईन आणि कॉन्टेट विषयी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
advertisement
3/7
बीबीसी मराठीशी बोलताना छाया कदम म्हणाल्या, "हिरो हिरोईनवाले दिवस आता गेलेत असं मला वाटतं. आता लोकांना माणसांची गोष्ट बघायला आवडते. तुम्हाला आजूबाजूचं जगणं बघायला आवडतं".
advertisement
4/7
"लोकांना आता कळतं की ते खोटं आहे. असं कसं होऊ शकतं ना, की तिथे माणूस मेलाय आणि इतके बाई छान गजरा माळून रडतेय".
advertisement
5/7
"असं कसं होऊ शकते. किंवा फुल्ल मेकअप करुन भाजी मोडतोय. बऱ्याच सीरियल्समध्ये बायका जेवण करताना दिसतंच नाहीत. मग त्या खात कशा असतील असा प्रश्न पडतो".
advertisement
6/7
"ज्या जेवण करताना दाखवतात त्या फुल्ल एकदम तयार होऊन करत असतात. त्यामुळे आधी होतं ते होरो हिरोईनवालं आता तुमची कथा तुमचा हिरो झाली आहे".
advertisement
7/7
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
"हिरो हिरोईनचे दिवस आता संपले"; Cannes गाजवणाऱ्या छाया कदम यांचं मोठं वक्तव्य