छावासाठी कोट्यवधी मानधन, पण विकी कौशलचा पहिला पगार किती होता माहितीय?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Vicky Kaushal First Salary : विकी कौशलने 'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याने या चित्रपटासाठी १० कोटी मानधन घेतल्याची चर्चा आहे.
advertisement
1/8

बॉलिवूडमध्ये दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा विकी कौशल सध्या ‘छावा’ चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. त्याच्या अभिनयासोबतच त्याने घेतलेल्या मानधनाची मोठी चर्चा सुरू आहे.
advertisement
2/8
तुम्हाला माहिती आहे का, विकीने या चित्रपटासाठी तब्बल १० कोटी मानधन घेतल्याचं बोललं जात आहे. मात्र, तुम्हाला त्याची पहिली कमाई माहित आहे का?
advertisement
3/8
विकी कौशलचा जन्म १६ मे १९८८ रोजी मुंबईतील मालाड परिसरात एका पंजाबी कुटुंबात झाला. त्याचे वडील शाम कौशल हे बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध स्टंटमन आणि ऍक्शन डायरेक्टर आहेत, तर आई हाऊसवाईफ आहे. विकीने अभियांत्रिकीच्या (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन) शाखेत पदवी मिळवली, पण त्याचं मन मात्र अभिनयाकडेच ओढलं गेलं.
advertisement
4/8
विकी कौशलचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. इंजिनिअरिंग पूर्ण करूनही त्याचं मन अभिनयातच रमत होतं, त्यामुळे त्याने २००० साली अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
5/8
सुरुवातीला अनुराग कश्यप यांच्या ‘गँग्स ऑफ वासेपुर’ चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. मात्र, अभिनयाची आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून त्याने थिएटरमध्ये काम करत संघर्ष सुरू ठेवला. या काळात त्याला मिळालेलं पहिलं मानधन अवघं २००० रुपये होतं.
advertisement
6/8
अखेर २०१५ मध्ये आलेल्या ‘मसान’ या चित्रपटाने त्याला खरी ओळख मिळवून दिली. त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षक आणि समीक्षक दोघांचीही मनं जिंकली. याच चित्रपटाने बॉलिवूडमध्ये त्याच्यासाठी नवी दारं उघडली आणि आज तो ‘छावा’ चित्रपटासाठी तब्बल १० कोटी मानधन घेणारा आघाडीचा अभिनेता बनला आहे.
advertisement
7/8
आज विकी बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्यांपैकी एक आहे. ‘उरी’, ‘संजू’, ‘राजी’, ‘सरदार उधम’ यांसारख्या चित्रपटांमधून त्याने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
advertisement
8/8
‘छावा’ हा १३० कोटींच्या बजेटचा भव्य ऐतिहासिक चित्रपट असून, विकी कौशलने त्यासाठी १० कोटी मानधन घेतल्याची जोरदार चर्चा आहे. एकेकाळी २००० रुपयांवर समाधान मानणारा विकी आज बॉलिवूडच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
छावासाठी कोट्यवधी मानधन, पण विकी कौशलचा पहिला पगार किती होता माहितीय?