खंडोबा 'पावला' आता देवदत्त नागे 'तांडव' करणार! शंकराच्या अवतारातील पहिली झलक
- Published by:Minal Gurav
Last Updated:
प्रसिद्ध अभिनेता देवदत्त नागे पुन्हा एकदा मराठी मालिकेत दिसणार आहे.त्याच्या नव्या भुमिकेची पहिली झलक समोर आली आहे.
advertisement
1/7

मराठी टेलिव्हिजनवर मागील वर्षात पौराणिक मालिकांचा ट्रेंड पाहायला मिळतोय. विठुमाऊली आणि दख्खनचा राजा जोतिबा, जय मल्हार सारख्या मालिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.
advertisement
2/7
या मालिकांमधील एक मालिका सर्वाधिक गाजली ती म्हणजे जय मल्हार. अभिनेता देवदत्त नागे यानं मालिकेत खंडोबाची प्रमुख भुमिका साकारली होती. खंडोबाच्या भुमिकेनंतर देवदत्त नागे पुन्हा एकदा पौराणिक मालिकेत दिसणार आहे.
advertisement
3/7
खंडोबानंतर देवदत्त नागे थेट भगवान शंकराच्या भुमिकेत दिसणार आहे. नव्या मालिकेतील त्याचा शंकराच्या अवतारातील पहिला लुक समोर आला आहे.
advertisement
4/7
‘उदे गं अंबे... कथा साडेतीन शक्तिपीठांची’असं नव्या मालिकेचं नाव आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर ही मालिका सुरू होणार आहे. दहा वर्षांआधी देवदत्तने स्टार प्रवाहच्या देवयानी मालिकेतून पदार्पण केलं होतं. त्याच वाहिनीवर तो आता प्रमुख नायक म्हणून काम करणार आहे.
advertisement
5/7
देवदत्त नागेनं जय मल्हार मालिकेत खंडोबाची भुमिका दमदार पद्धतीनं साकारली. देवदत्त नागेला खंडोबाच्या भुमिकेमुळे प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं.
advertisement
6/7
शिवशंकरांची भुमिका साकारण्याबाबत देवदत्त म्हणाला, "महादेवांपुढे श्रद्धेने लीन होऊन या नव्या प्रोजेक्टची सुरुवात करतोय. प्रेक्षकांचा आशीर्वाद आणि प्रेम दोन्ही मिळावं हीच अपेक्षा आहे".
advertisement
7/7
‘उदे गं अंबे... कथा साडेतीन शक्तिपीठांची’या मालिकेत देवदत्त नागेला शिवशंकरांच्या भुमिकेत पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी उत्सुकता दाखवली आहे. ही नवी मालिका कधी सुरू होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
खंडोबा 'पावला' आता देवदत्त नागे 'तांडव' करणार! शंकराच्या अवतारातील पहिली झलक