Pune Navale Bridge Accident : 2 वर्षांपूर्वी लग्न, 3 महिन्यांचं बाळ… नवले पूल अपघातात मराठी अभिनेत्याचं आयुष्य संपलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Pune Navale Bridge Accident : पुण्यातील नवले ब्रीजवर झालेल्या अपघतात एका मराठी अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे. दोन ट्रकच्या धडकेत कारचा चेंदामेंदा झाला आहे. अभिनेत्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
1/7

पुण्यातील नवले ब्रीजवर झालेल्या भीषण अपघाताने सर्वांना हादरवून सोडलं. या दुर्घटनेत 30 वर्षांचा मराठी अभिनेता धनंजय कोळीचा मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
2/7
गुरुवारी झालेल्या या भीषण धडकेत मोठ्या वाहनांच्यामध्ये धनंजयची छोटी कार अडकली. कारचा चक्काचूर झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
advertisement
3/7
अभिनेता धनंजय कोळीच्या अपघाती मृत्यूपश्चात त्याची तीन महिन्यांची मुलगी, बायको आणि आई वडील असं कुटुंब आहे. धनंजयचं लग्नाला फक्त 2 वर्षं झाली होती. संसार आत्ताच सुरू झाला होता. स्वप्नं रुजत होती. पण नशीबाचे फासे फिरले आणि धनंजय तीन महिन्याच्या लेकीला सोडून कायमचा निघून गेला.
advertisement
4/7
तीन महिन्यांपूर्वीच तो बाबा झाला होता. छोट्या बाळाचं हास्य, पहिलं बाळंतपण, पहिलं बाबा म्हणणं… सगळं अनुभवायचं बाकी होतं. अपघात झाला त्यावेळी धनंजयची पत्नी आणि तीन महिन्याचा मुलगा लातूरमध्ये होते.
advertisement
5/7
धनंजय मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरचा होता. गेल्या काही काळापासून पुण्यात आई-वडिलांकडे यायचा. अपघाताच्या दिवशीही तो आई-वडिलांकडे येत होता तेव्हा रस्त्यात त्याचा अपघात झाला.
advertisement
6/7
धनंजयचं इन्स्टाग्राम चेक केल् त्याने स्वतः ची ओळख एक्टर अशी दिली आहे. काही नाटकं, काही लहान भूमिका त्याने केल्याचं दिसतंय.
advertisement
7/7
अभिनयासोबत त्याने 6 महिन्यांपूर्वी वाहतूक व्यवसाय सुरू केला होता. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी, बाळाच्या भविष्यासाठी तो अनेक कामं एकटाच सांभाळत होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Pune Navale Bridge Accident : 2 वर्षांपूर्वी लग्न, 3 महिन्यांचं बाळ… नवले पूल अपघातात मराठी अभिनेत्याचं आयुष्य संपलं