TRENDING:

'आम्ही भारताविरोधात फिल्म बनवली तर...' पाकिस्तानी अभिनेत्याला खुपलं Dhurandhar चं यश, पाकला सुनावलं

Last Updated:
Dhurandhar : 'धुरंधर' या सिनेमाचा भारताचा पाकिस्तानमध्येही बोलबाला पाहायला मिळत आहे. दरम्यान पाक अभिनेता Imran Abbas ला मात्र 'धुरंधर'चं यश खुपलं आहे.
advertisement
1/7
'आम्ही भारताविरोधात फिल्म बनवली तर...' पाक अभिनेत्याला खुपला Dhurandhar
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा 2025 मधला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 5 डिसेंबर 2025 रोजी रिलीज झालेल्या या अॅक्शन, थ्रिलर चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात रणवीरने भारतीय जासूस हमजा अली मजारी ही भूमिका साकारली आहे. कराचीमधील ल्यारी या भागावर आधारित या सिनेमाचं कथानक आहे. रणवीरसह अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन हे कलाकारदेखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
advertisement
2/7
'धुरंधर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे. जगभरात या चित्रपटाने 600 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पाकिस्तानमध्ये या चित्रपटावरुन मात्र वाद होत आहेत. 'धुरंधर' ही पाकच्या विरोधातील प्रोपगंडा फिल्म असल्याचं काही पाकिस्तानचे कलाकार म्हणत आहेत.
advertisement
3/7
'धुरंधर'मध्ये पाकिस्तानला नकारात्मक दाखवण्यात आल्याचं पाकमधील लोक म्हणत आहेत. अशातच आता पाकिस्तानी अभिनेता इमरान अब्बासने जे 'धुरंधर'चं कौतुक करत आहेत अशा पाकिस्तानी लोकांना सुनावलं आहे. इमरानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत 'धुरंधर'चं कौतुक करणाऱ्या पाकमधील लोकांना फटकारलं आहे.
advertisement
4/7
इमरान अब्बासने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,"भारतात रिलीज झालेल्या चित्रपटात संपूर्ण जगासमोर पाकिस्तान विरोधात, आपल्या देशाविरोधात, आपल्या धर्माविरोधात आणि आपल्या ओळखीविरोधात चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं आहे".
advertisement
5/7
इमरान अब्बासने पुढे लिहिलं आहे,"सर्वात जाहिरवानी गोष्ट म्हणजे पाकिस्तानमधील काही लोक, आपल्या समाजातील लोक मात्र या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. ते या चित्रपटावर रील्स बनवत आहेत. AI चा वापर करत फोटो, व्हिडीओ बनवत आहेत. चित्रपटातील आणि त्यातील कलाकारांचं कौतुक करत आहेत. अभिमानाने या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत".
advertisement
6/7
चित्रपट चांगला बनला आहे. हाय क्लालिटीचं प्रोडक्शन आहे. पण आपल्या आत्मसन्मानाला मात्र चुकीच्या पद्धतीने दाखवलं जात आहे. या गोष्टीचा विचार करा की पाकिस्तानमध्ये भारताच्या विरोधातील चित्रपट बनला तर भारत लगेचच यावर आवाज उठवेल. चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देणं चुकीचं आहे, असंही इमरान अब्बास म्हणाला आहे.
advertisement
7/7
इमरान अब्बास याने पाकिस्तानमधील अनेक नाटकांत काम केलं आहे. खुदा और मोहब्बत, कोई चांद रख, तुम्हारे हुस्न के नाम, मोहब्बत तुमसे नफरत है आणि थोडा सा हक अशा अनेक नाटकांत त्याने काम केलंय. तसेच 'क्रिएचर्स 3डी' आणि 'ए दिल है मुश्किल' या बॉलिवूडच्या चित्रपटांतही त्याने काम केलंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'आम्ही भारताविरोधात फिल्म बनवली तर...' पाकिस्तानी अभिनेत्याला खुपलं Dhurandhar चं यश, पाकला सुनावलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल