Dhurandhar: भारतात बनावट नोटांचं जाळं पसरवणाऱ्या जावेद खानानीचा झालेला भयानक अंत! कोणी काढला काटा?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Javed Khanani Death: दुबईच्या चकचकीत इमारतींच्या आडोशाने जगभरातील दहशतवादाला रसद पुरवणारा जावेद खानानी नेमका कोण होता आणि त्याचा अंत इतका रहस्यमय का ठरला?
advertisement
1/9

मुंबई: सध्या बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' चित्रपटाचा तुफान राडा सुरू आहे. पडद्यावर रणवीर सिंग आणि अक्षय खन्नाची जुगलबंदी पाहून प्रेक्षक वेडे झाले आहेत, पण तुम्हाला माहीत आहे का? या चित्रपटातील 'खानानी ब्रदर्स'ची कथा केवळ लेखकाची कल्पनाशक्ती नाही, तर ती एका भयानक वास्तवावर आधारित आहे.
advertisement
2/9
दुबईच्या चकचकीत इमारतींच्या आडोशाने जगभरातील दहशतवादाला रसद पुरवणारा जावेद खानानी नेमका कोण होता आणि त्याचा अंत इतका रहस्यमय का ठरला? यामागचं सत्य जाणून घेऊया.
advertisement
3/9
दुबई म्हटलं की आपल्याला बुर्ज खलिफा आणि आलिशान मॉल आठवतात. पण याच चकाकीच्या मागे एक काळी दुनिया चालते, जिला 'हवाला' आणि 'शॅडो बँकिंग' म्हटलं जातं. या काळ्या विश्वाचे सम्राट होते जावेद खानानी आणि अल्ताफ खानानी.
advertisement
4/9
चित्रपटात आपण जे पाहतोय, त्यापेक्षा खरी गोष्ट कितीतरी पटीने थरारक आहे. या दोघांनी 'खानानी अँड कालिया इंटरनॅशनल' (KKI) नावाची कंपनी उभी केली होती. दिसायला ही एक करन्सी एक्सचेंज कंपनी होती, पण प्रत्यक्षात तो दहशतवाद्यांचा फायनान्शिअल स्विचबोर्ड होता.
advertisement
5/9
अमेरिकी गुप्तचर यंत्रणांच्या मते, जावेद खानानीचं नेटवर्क केवळ पैसे इकडून तिकडे हलवत नव्हतं, तर ते लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि दाऊद इब्राहिमच्या 'डी-कंपनी'साठी ऑक्सिजनचं काम करायचं.
advertisement
6/9
भारतात बनावट नोटा (FICN) पाठवून इथली अर्थव्यवस्था खिळखिळी करणे आणि तोच पैसा काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्यासाठी वापरणे, हा या खानानी ब्रदर्सचा मुख्य धंदा होता. या सगळ्यामागे पाकिस्तानच्या ISI चा वरदहस्त होता.
advertisement
7/9
जावेद खानानीच्या आयुष्यात सर्वात मोठा ट्विस्ट चित्रपटातील क्लायमॅक्ससारखाच आला. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान मोदींनी भारतात नोटाबंदीची घोषणा केली. ५०० आणि १००० च्या नोटा एका रात्रीत रद्दी झाल्या. याचा सर्वात मोठा फटका कोणाला बसला असेल, तर तो जावेद खानानीला! त्याचे बनावट नोटांचे गोडाऊन आणि भारतात पेरलेलं कोट्यवधींचं जाळं एका झटक्यात उद्ध्वस्त झालं.
advertisement
8/9
नोटाबंदीच्या अवघ्या एक महिन्यानंतर, डिसेंबर २०१६ मध्ये कराचीहून एक बातमी आली, "जावेद खानानीचा एका निर्माणाधीन इमारतीवरून पडून मृत्यू!" हा अपघात होता, आत्महत्या होती की कुणीतरी केलेला गेम? आजही हे एक कोडं आहे.
advertisement
9/9
काहींच्या मते, नोटाबंदीमुळे डोकं वर काढणं कठीण झाल्याने त्याने आत्महत्या केली. तर काहींना वाटतं की, तो आता ISI साठी ओझं ठरला होता, म्हणून त्याचा पत्ता कट करण्यात आला. 'धुरंधर' पाहताना जेव्हा आपण या पात्रांना पडद्यावर बघतो, तेव्हा खानानीच्या या रहस्यमय मृत्यूची वेळ मनात अनेक प्रश्न निर्माण करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dhurandhar: भारतात बनावट नोटांचं जाळं पसरवणाऱ्या जावेद खानानीचा झालेला भयानक अंत! कोणी काढला काटा?