TRENDING:

Bhabiji Ghar Par Hain: आडनाव मराठी, पण महाराष्ट्रीय नाहीय 'अंगूरी भाभी'! शुभांगी अत्रेचा शॉकिंग खुलासा, मग मुळची कुठली?

Last Updated:
Bhabiji Ghar Par Hain Fame Shubhangi Atre: 'भाभी जी घर पर है' फेम अभिनेत्री शुभांगी अत्रेने तिच्या आडनावावरून होणारा एक गैरसमज दूर केला आहे.
advertisement
1/10
आडनाव मराठी, पण महाराष्ट्रीय नाहीय 'अंगूरी भाभी'! शुभांगी अत्रेचा शॉकिंग खुलासा
पण पडद्यावर इतक्या उत्साही दिसणाऱ्या शुभांगीचे वैयक्तिक आयुष्य मात्र मोठ्या संघर्षातून गेले आहे, विशेषतः तिचा घटस्फोट खूपच वेदनादायक होता.
advertisement
2/10
नुकत्याच एका मुलाखतीत शुभांगीने तिच्या आयुष्यातील अनेक रहस्ये उघड केली, ज्यात तिच्या तुटलेल्या १९ वर्षांच्या लग्नाचे कारणही सांगितले.
advertisement
3/10
२००३ मध्ये शुभांगीने पीयूष पूरे यांच्याशी लग्न केले होते. मात्र, लग्नानंतरच्या एका गोष्टीने तिला खूप वेदना दिल्या. मुलाखतीत जेव्हा तिला विचारले गेले, की पतीला दारूचे व्यसन होते हे तिला लग्नाआधी माहीत नव्हते का?
advertisement
4/10
यावर शुभांगीने प्रामाणिकपणे उत्तर दिले, "नाही, मला इतके माहीत नव्हते. लग्नापूर्वी तर अजिबातच नाही. पण नंतर कळले की ते कधी-कधी दारू पितात." शुभांगी सतत शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने तिचे घरी राहणे कमी होते.
advertisement
5/10
याबद्दलचा खरा धक्का तर तिला तिच्या मुलीकडून बसला. ती म्हणाली, "माझी मुलगी आशी मला कधी-कधी सांगायची की, 'पापा दारू पितात, घरीच पितात आणि त्यांचे वागणे खूप चुकीचे असते'."
advertisement
6/10
शुभांगी नेहमी मुंबईत घर असावे, गाडी असावी, यासाठी कामावर लक्ष केंद्रित करत होती, पण कोविड लॉकडाऊनच्या काळात परिस्थिती पूर्णपणे बिघडली.
advertisement
7/10
शुभांगी म्हणाली, "कोविडनंतर परिस्थिती खूपच बिघडली. ते खूप जास्त दारू प्यायचे आणि प्यायल्यानंतर त्यांचे माझ्यासोबत आणि माझ्या मुलीसोबत वागणे खूप वाईट असायचे."
advertisement
8/10
या सगळ्या त्रासामुळे शुभांगीने २०२२ मध्ये पतीपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आणि या वर्षी फेब्रुवारीमध्ये तिचा घटस्फोट मंजूर झाला. मात्र, दुर्दैवाने या वर्षी १९ एप्रिल रोजी पीयूष पूरे यांचे निधन झाले. आज शुभांगी सिंगल मदर म्हणून आपल्या मुलीची काळजी घेत आहे.
advertisement
9/10
शुभांगीने तिच्या आडनावावरून होणारा एक गैरसमजही दूर केला. ती म्हणाली, "माझ्या 'अत्रे' आडनावामुळे मी मराठी आहे, असं अनेकांना वाटतं. पण मी मूळची इंदूरची आहे."
advertisement
10/10
ती पुढे म्हणाली की, आता ती हळूहळू मराठी शिकत आहे आणि मराठी चित्रपट पाहते, कारण त्यांचे विषय आणि कथालेखन तिला खूप आवडते. मराठीसोबत ती बंगाली आणि मल्याळम चित्रपटही आवडीने बघते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bhabiji Ghar Par Hain: आडनाव मराठी, पण महाराष्ट्रीय नाहीय 'अंगूरी भाभी'! शुभांगी अत्रेचा शॉकिंग खुलासा, मग मुळची कुठली?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल