हिरोईन म्हणून फ्लॉप, आयटम नंबरने एका रात्रीत केलं स्टार; 'खल्लास गर्ल' आता करते काय?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Khallas Girl journey : 'खल्लास गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री एका रात्रीत झाली हिट. हिचा त्याआधीचा प्रवास तुम्हाला माहितीये का?
advertisement
1/9

भारतीय अभिनेत्री ईशा कोप्पीकरला राम गोपाल वर्मा यांच्या 'अंडरवर्ल्ड' या चित्रपटातील आयटम साँगमुळे प्रसिद्धी मिळाली. या गाण्यानंतर ईशा कोप्पीकर बॉलिवूडची खल्लास गर्ल म्हणून ओळखली जाऊ लागली.
advertisement
2/9
तिने तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेतील अनेक चित्रपटांमध्येही काम केलं. गेल्या काही वर्षांत, तिने मोठ्या पडद्यावर विविध भूमिका साकारल्या आहेत. 'कृष्णा कॉटेज' या हिंदी हॉरर चित्रपटातील तिच्या भूमिकेचे समीक्षक आणि प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे.
advertisement
3/9
ईशा कोप्पीकरने तिच्या मॉडेलिंग कारकिर्दीची सुरुवात 1995 च्या मिस इंडिया स्पर्धेने केली. जिथे तिने मिस टॅलेंटचा किताब जिंकला. तिचा पहिला अभिनय 1997 च्या तेलुगू चित्रपट 'डब्ल्यू/ओ व्ही. वर प्रसाद' मध्ये होता.
advertisement
4/9
अभिनेत्रीचा पहिला तमिळ चित्रपट 'कधल कविधाई' होता. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तिने तीन कन्नड चित्रपटांमध्येही काम केलं ते त्यावेळी बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले.
advertisement
5/9
2000 मध्ये ईशा कोप्पीकर हिंदी चित्रपट 'फिजा' मध्ये दिसली. हा बॉलिवूडचा एक क्लासिक चित्रपट मानला जातो. खालिद मोहम्मद दिग्दर्शित या चित्रपटात करिश्मा कपूर आणि हृतिक रोशन यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. या चित्रपटात ईशाने एक छोटी भूमिका केली होती.
advertisement
6/9
त्यानंतर तिने राजीव राय दिग्दर्शित 'प्यार इश्क और मोहब्बत' चित्रपटात मुख्य भूमिका केली होती ज्यामध्ये अर्जुन रामपाल आणि सुनील शेट्टी होते. या चित्रपटात ईशा कोप्पीकरने सुनील शेट्टीसोबत काम केले होते.
advertisement
7/9
काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्यानंतर तिला राम गोपाल वर्माच्या 'कंपनी' चित्रपटातील तिच्या आयटम नंबरने प्रसिद्धी मिळाली. तिला 'खल्लास गर्ल' म्हणून ओळखलं जाऊ लागलं. 'खल्लास गर्ल' गाण्यासाठी तिला 'मोस्ट एक्साइटिंग न्यू फेस' साठी स्टारडस्ट पुरस्कार देखील मिळाला.
advertisement
8/9
2005 मध्ये ती दिग्दर्शक संगीत सिवानच्या 'क्या कूल है हम' या प्रौढ विनोदी चित्रपटात दिसली. 'डॉन' चित्रपटात शाहरुख खानची प्रेयसीची भूमिका देखील केली होती. ती शेवटची 2012 मध्ये आलेल्या 'लव्ह यू लोकतंत्र' या हिंदी चित्रपटात दिसली होती.
advertisement
9/9
ईशा कोप्पीकरने 2009 मध्ये हॉटेल व्यावसायिक टिमी नारंगशी लग्न केले. जुलै 2014मध्ये तिने त्यांची मुलगी रियाना हिच्याशी जन्म दिला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
हिरोईन म्हणून फ्लॉप, आयटम नंबरने एका रात्रीत केलं स्टार; 'खल्लास गर्ल' आता करते काय?