TRENDING:

वडिलांची शिस्त, घरात कडक नियम; स्वतःला पहिल्यांदा TV वर पाहण्यासाठी प्राजक्ता माळीला करावी लागली मोठी खटपट

Last Updated:
Prajakta Mali : ‘MHJ Unplugged’मध्ये संवाद साधताना प्राजक्ताने सांगितलं की, तिच्या वडिलांना खूप शिस्त आवडते आणि ते हवालदार होते. त्यांच्या घरातले नियम खूप कडक होते.
advertisement
1/9
स्वतःला पहिल्यांदा TV वर पाहण्यासाठी प्राजक्ता माळीला करावी लागली मोठी खटपट
मुंबई: ‘हास्यजत्रा’ची लाडकी सूत्रसंचालिका आणि मराठी मनोरंजन विश्वातील ग्लॅमरस अभिनेत्री प्राजक्ता माळी आज महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. पण, आजच्या या यशामागे तिचा खडतर प्रवास आहे, तसेच तिच्या घरातले काही मजेदार किस्से आहेत.
advertisement
2/9
नुकत्याच एका शोमध्ये प्राजक्ताने तिच्या अगदी सुरुवातीच्या करिअरमधील असाच एक किस्सा सांगितला, जेव्हा तिला पहिला टीव्ही शो पाहण्यासाठी थेट शेजाऱ्यांच्या घरी जावं लागलं होतं!
advertisement
3/9
‘MHJ Unplugged’मध्ये संवाद साधताना प्राजक्ता तिच्या बालपणीच्या आठवणींमध्ये रमली. तिने सांगितलं की, तिच्या वडिलांना खूप शिस्त आवडते आणि ते हवालदार होते. त्यांच्या घरातले नियम खूप कडक होते.
advertisement
4/9
प्राजक्ता म्हणाली, “आमच्या घरी बाबा घरी आले की, सर्वात आधी टीव्ही बंद व्हायचा. बाहेर बूट काढायचे आणि मगच घरात यायचं, अशी शिस्त होती!”
advertisement
5/9
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, “माझ्या दहावीपर्यंत आमच्या घरात केबल कनेक्शनच नव्हतं!” त्यामुळे जेव्हा प्राजक्ताची एका रिअ‍ॅलिटी शोसाठी निवड झाली, तेव्हा ती तो शो पाहणार कशी, हा मोठा प्रश्न होता.
advertisement
6/9
प्राजक्ता सांगते की, ती जेव्हा पहिल्यांदा टीव्ही शोमध्ये दिसली, तेव्हा तिला खूप आनंद झाला. पण, तो शो तिला पहिल्यांदा पाहता आला नाही.
advertisement
7/9
ती म्हणाली, “पहिला टेलिकास्ट मी पाहिला नाही, कारण मी त्यावेळी बाहेर होते. त्यामुळे मला शेजारच्यांच्या घरी जाऊन रिपीट टेलिकास्ट पाहावा लागला!”
advertisement
8/9
शो पहिल्यांदा प्रदर्शित झाल्यानंतर तिला शाळेत अनेक मित्र-मैत्रिणींनी कॉम्प्लिमेंट दिल्या, पण तिने तो शो पाहिलाच नव्हता. आपल्या पहिल्या शोसाठी स्वतःचा टीव्ही नसणं आणि शेजाऱ्यांवर अवलंबून राहावं लागणं, हा आजच्या सुपरस्टारसाठी खूपच गोड आणि गंमतीशीर अनुभव आहे!
advertisement
9/9
शिस्तप्रिय वडिलांमुळे घरात टीव्हीचं महत्त्व कमी होतं, पण याच कठोर वातावरणातून बाहेर पडून प्राजक्ताने आज स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
वडिलांची शिस्त, घरात कडक नियम; स्वतःला पहिल्यांदा TV वर पाहण्यासाठी प्राजक्ता माळीला करावी लागली मोठी खटपट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल