वयाच्या 3 ऱ्या वर्षी लैंगिक छळ, कास्टिंग काऊचची शिकार, 'दंगल गर्ल' बनण्यासाठी अभिनेत्रीने सोसला मोठा त्रास
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
आमिर खानच्या ऑनस्क्रीन मुलीने मनोरंजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, पण हा प्रवास तिच्यासाठी सोपा नव्हता.
advertisement
1/7

दंगल गर्ल फातिमा सना शेखला तिच्या वाढदिवसानिमित्त चाहते आणि सेलिब्रिटी खूप प्रेम आणि शुभेच्छा देत आहेत. आमिर खानची ऑनस्क्रीन मुलगी फातिमा सना शेख हिने मनोरंजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, पण हा प्रवास तिच्यासाठी सोपा नव्हता.
advertisement
2/7

फातिमा सना शेख हिला लहानपणीच एका भीषण अपघाताला सामोरे जावे लागले आहे. वयाच्या ३ व्या वर्षीच ती लैंगिक छळाची शिकार झाली. अभिनेत्रीने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते, “मी पाच वर्षांची असताना माझ्यासोबत छेडछाड झाली... नाही! मी तीन वर्षांची होते. त्यामुळे सेक्सिज्म किती खोलवर आहे हे तुम्ही समजू शकता. ही एक लढाई आहे जी आम्ही दररोज लढतो. मला आशा आहे की आमचे भविष्य चांगले असेल.”
advertisement
3/7
इतकेच नाही तर करिअरच्या सुरुवातीला फातिमा सना शेखला कास्टिंग काउचलाही सामोरे जावे लागले होते. एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली होती- “मलाही कास्टिंग काउचचा सामना करावा लागला आहे. मी अशा लोकांना भेटले ज्यांनी मला सांगितले की तुम्हाला फक्त सेक्सद्वारे काम मिळू शकते. यामुळे मला अनेकदा काम गमवावे लागले आहे. माझ्या जागी दुसऱ्याला घेण्यात आले. पण मला वाटते की या इंडस्ट्रीबाहेरील अनेकांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आणि प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये सेक्सिज्म आहे.”
advertisement
4/7
फातिमा सना शेखला अनेकदा नकाराचा सामना करावा लागला आहे. आपली व्यथा मांडताना ती म्हणाली की, “मला अनेकदा सांगण्यात आले आहे की तू हिरोईन बनू शकणार नाहीस. तू दीपिका किंवा ऐश्वर्यासारखी दिसत नाहीस, तर तू हिरोईन कशी होणार? इंडस्ट्रीत असे अनेक लोक आहेत, जे तुम्हाला डी-मोटिव्हेट करतात. एखादीने नायिका बनण्यासाठी कसे दिसावे यासाठी लोकांनी सौंदर्य मानके ठरवली आहेत. पण आता माझ्यासारख्यांनाही संधी मिळू लागली आहे. सुपर मॉडेल दिसणाऱ्या नसून सामान्य दिसणाऱ्या माझ्यासारख्या मुलींसाठीही चित्रपट बनवले जाऊ लागले आहेत.”
advertisement
5/7
फातिमा सना शेखला २०१६ मध्ये आलेल्या 'दंगल' चित्रपटातून ओळख मिळाली. या चित्रपटात ती आमिर खानची मुलगी गीता फोगटच्या भूमिकेत दिसली होती.
advertisement
6/7
पण दंगल हा फातिमा सना शेखचा पहिला चित्रपट नव्हता. याआधी तिने १९९७ मध्ये आलेल्या 'चाची ४२०' चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते.
advertisement
7/7
'वन टू का फोर'मध्येही ती दिसली होती. तिने काही टीव्ही शोमध्येही काम केले होते, पण नंतर ती चित्रपटांपासून दुरावली. यश न मिळाल्याने तिला अभिनय सोडायचा होता. मात्र दंगल या चित्रपटातून तिला विशेष ओळख मिळाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
वयाच्या 3 ऱ्या वर्षी लैंगिक छळ, कास्टिंग काऊचची शिकार, 'दंगल गर्ल' बनण्यासाठी अभिनेत्रीने सोसला मोठा त्रास