TRENDING:

Chhaya Kadam : मराठमोळ्या छाया कदमचा बॉलिवूडमध्ये डंका! Filmfare वर कोरलं नाव; म्हणाली,"एका मराठी मुलीला..."

Last Updated:
Chhaya Kadam Filmfare Awards 2025 : जगभरात आपल्या अभिनयाची भुरळ पाडणाऱ्या छाया कदम यांनी बड्या स्टार्सला मागे टाकत 'फिल्मफेअर पुरस्कार 2025' पटकावला आहे.
advertisement
1/7
मराठमोळ्या छाया कदमचा बॉलिवूडमध्ये डंका! Filmfare वर कोरलं नाव
मराठमोळी अभिनेत्री छाया कदम गेल्या दोन वर्षांपासून चांगलीच चर्चेत आहे. आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवत जगभरात त्यांनी आपल्या अभिनयाची भुरळ पाडली आहे. विविध धाटणीचे चित्रपट घेऊन त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. आता इंडस्ट्रीत मानाच्या समजल्या जाणाऱ्या फिल्मफेअर पुरस्कारावर त्यांनी आपलं नाव कोरलं आहे.
advertisement
2/7
छाया कदम यांनी 'लापता लेडीज' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे सर्वत्र छाया कदम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
advertisement
3/7
'फिल्मफेअर पुरस्कार 2025' मिळताच ब्लॅक लेडी अर्थात छाया कदम म्हणाल्या,"मला यंदाचा फिल्मफेअर मिळेल असा मी विचारच केला नव्हता. कारण नेहमी कौतुक खूप होत असे पण पुरस्कार धोका द्यायचा. यावेळी मी विचार हाच विचार करुन आले की पुरस्कार मिळो किंवा न मिळो पण छान नटूनथटून जाऊयात. खूप-खूप धन्यवाद".
advertisement
4/7
छाया कदम पुढे म्हणाल्या,"एका मराठी मुलीला या प्रोजेक्टचा भाग केल्याबद्दल आभार. मला स्वत:वर विश्वास नव्हता की मी या पात्राला न्याय देऊ शकेल. किरणने माझा विश्वास वाढवला. शेवटी एवढचं सांगेल हा पुरस्कार त्यांच्यासाठी आहे जे इंडस्ट्रीत अनेक वर्षांपासून काम करत आहेत आणि मेरा टाईम कब आएगा असा विचार करत आहेत".
advertisement
5/7
छाया कदम यांनी चक्क बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितला मागे टाकत फिल्मफेअर पटकावला आहे. कारण या कॅटेगरीमध्ये माधुरी दीक्षितलाही नामांकन होतं.
advertisement
6/7
छाया कदम फिल्मफेअर पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावुक झाल्या होत्या. कान, ऑस्कर, गोल्डन ग्लोब सारख्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा आणि चित्रपट महोत्सवांमध्ये आपला दबदबा ठेवलेल्या छाया कदम यांनी आता हिंदी फिल्म इंडस्ट्रीतही आपली छाप सोडली आहे.
advertisement
7/7
छाया कदम यांनी 'लापता लेडीज' या चित्रपटात मंजू ही भूमिका साकारली होती. किरण राव यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली. या चित्रपटात दोन नवविवाहीत वधू केंद्रस्थानी आहेत. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Chhaya Kadam : मराठमोळ्या छाया कदमचा बॉलिवूडमध्ये डंका! Filmfare वर कोरलं नाव; म्हणाली,"एका मराठी मुलीला..."
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल