Friday Releases : शुक्रवारी एंटरटेनमेंटचा महाडोज, या 13 फिल्म-सीरिज थिएटर आणि OTT वर होतायत रिलीज
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Friday OTT Releases : शुक्रवारी ओटीटीवर मोठा धमाका होणार आहे. 21 नोव्हेंबरच्या शुक्रवारी एकापेक्षा एक चित्रपट आणि सीरिज रिलीज होणार आहेत. यात The Family Man 3 पासून ते मस्ती 4 पर्यंत अनेक फिल्म आणि सीरिजचा समावेश आहे.
advertisement
1/13

मस्ती 4 (Masti 4) : 'मस्ती 4' या बहुचर्चित चित्रपटात रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय, आफताब शिवदसानी, तुषार कपूर आणि नरगिस फाकरी सारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. मिलाप जवेरी दिग्दर्शित हा चित्रपट 21 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
advertisement
2/13
120 बहादुर (120 Bahadur) : 120 बहादुर या चित्रपटात फरहान अख्तर मुख्य भूमिकेत आहेत. रजनीष घई यांच्या या सिनेमात ऐतिहासिक वॉर ड्रामा पाहायला मिळेल. 21 नोव्हेंबर 2025 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.
advertisement
3/13
द फॅमिली मॅन 3 (The Family Man 3) : 'द फॅमिली मॅन 3' ही बहुचर्चित सीरिज अखेर आज 21 नोव्हेंबरपासून प्रेक्षक प्राईम व्हिडीओवर पाहू शकतात. या सीरिजमध्ये मनोज बाजपेयी, शारिब हाशमी, श्रेया धन्वंतरी, अश्लेषा ठाकुर, वेदांत सिन्हा, जयदीप अलहावत आणि शरद केळकर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
advertisement
4/13
विलयथ बुद्ध (Vilayath Buddha) : 'विलयश बुद्ध' या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकेत आहेत. 21 नोव्हेंबरला हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.
advertisement
5/13
पांच मीनार (Paanch Minar) : 'पांच मीनार' या चित्रपटात राज तरुण, राशी सिंह, अजय घोष हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा एक क्राइम कॉमेडी थ्रिलर तेलुगू सिनेमा आहे. 21 नोव्हेंबरला हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.
advertisement
6/13
येलो (Yellow) : 'येलो' ही एक तामिळ भाषेतील रोमँटिक ड्रामा फिल्म आहे. हरी महादेवन यांनी हा सिनेमा बनवला आहे. या चित्रपटात पूर्णिमा रवि, वैभव मुरुगेसन हे कलाकार झळकतील. 21 नोव्हेंबरला हा सिनेमा सिनेमागृहात पाहता येईल.
advertisement
7/13
जिद्दी इश्क (Ziddi Ishq) : 'जिद्दी इश्क' प्रेक्षकांना 21 नोव्हेंबरपासून जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. हा एक रोमँटिक ड्रामा आहे.
advertisement
8/13
मिडिल क्लास (Middle Class) : 'मिडिल क्लास' हा चित्रपट 21 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबाची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. Munishkanth आणि Vijayalakshmi या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
advertisement
9/13
12A रेल्वे कॉलनी (12A Railway Colony) : '12A रेल्वे कॉलनी' हा सस्पेन्स सुपरनॅचरल ड्रामा असणारा सिनेमा 21 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अल्लारी नरेश आणि डॉ. कामाक्षी भास्कर्ला मुख्य भूमिकेत आहेत.
advertisement
10/13
होम बाउंड : जान्हवी कपूर, ईशान खट्टर आणि विशाल जेठवा यांचा 'होम बाउंड' हा बहुप्रतीक्षित सिनेमा अखेर 21 नोव्हेंबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे.
advertisement
11/13
मास्क (Mask) : 'मास्क' हा चित्रपट 21 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. ही एक डार्क कॉमेडी फिल्म आहे. विकर्णन अशोक यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. कविन आणि Andrea Jeremiah या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
advertisement
12/13
द बंगाल फाइल्स (The Bengal Files) : विवेक अग्निहोत्री यांचा 'द बंगाल फाइल्स' हा सिनेमा 21 नोव्हेंबर 2025 रोजी Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
advertisement
13/13
डायनिंग विथ द कपूर्स (Dining With The Kapoors) : 'डायनिंग विथ द कपूर्स' ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये संपूर्ण कपूर कुटुंब एकत्र दिसणार आहे. कपूर कुटुंबियांचे अनेक किस्से या शोमध्ये उलगडले जाणार आहेत. 21 नोव्हेंबरपासून नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Friday Releases : शुक्रवारी एंटरटेनमेंटचा महाडोज, या 13 फिल्म-सीरिज थिएटर आणि OTT वर होतायत रिलीज