'भाऊचा धक्का' भारी पडला! ग्लॅमरस अभिनेत्रीचा 'बिग बॉस'च्या घरातून पत्ता कट, रितेशच्या रागाचा फटका की प्रेक्षकांची नाराजी?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Elimination: पहिल्या आठवड्यात शांतता होती, दुसऱ्या आठवड्यात राधा पाटीलने निरोप घेतला आणि आता तिसऱ्या आठवड्याच्या 'भाऊच्या धक्क्या'वर एक मोठा धमाका होणार असल्याची चर्चा आहे.
advertisement
1/9

'बिग बॉस मराठी ६' च्या घरात प्रत्येक दिवशी हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. पण दर आठवड्याला कोणाचं तरी स्वप्न तुटतं आणि कोणाला तरी घराबाहेरचा रस्ता धरावा लागतो.
advertisement
2/9
पहिल्या आठवड्यात शांतता होती, दुसऱ्या आठवड्यात राधा पाटीलने निरोप घेतला आणि आता तिसऱ्या आठवड्याच्या 'भाऊच्या धक्क्या'वर एक मोठा धमाका होणार असल्याची चर्चा आहे.
advertisement
3/9
तिसऱ्या आठवड्यात नॉमिनेशनची प्रक्रिया खूपच रंजक झाली होती. एकूण ८ सदस्य डेंजर झोनमध्ये होते, यात दिपाली सय्यद, विशाल कोटियन, प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे, करण सोनावणे, सोनाली राऊत, ओमकार राऊत, रुचिता जामकर यांची नावं होती.
advertisement
4/9
या नावांमध्ये सोनाली राऊत ही सर्वात चर्चेत होती. मात्र, प्रेक्षकांकडून मिळणारी मतं तिला वाचवू शकली नाहीत. सोनालीने आपल्या ड्रामाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले असले, तरी खेळाप्रती असलेल्या तिच्या उदासीनतेमुळे चाहत्यांमध्ये नाराजी होती.
advertisement
5/9
मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार, घरातील ग्लॅमरस चेहरा आणि आपल्या अतरंगी वागण्यामुळे चर्चेत राहिलेली सोनाली राऊत हिचं बिग बॉसमधील प्रवास संपला आहे.
advertisement
6/9
सोनाली राऊत घराबाहेर जाण्यामागे केवळ मतं कमी असणं हे एकमेव कारण नाही, तर तिचा टास्कबद्दलचा निरुत्साहीपणाही कारणीभूत ठरल्याचं बोललं जातंय.
advertisement
7/9
'शेणाचं दार अन् मेणाचं दार' या कॅप्टन्सी टास्कमध्ये सोनालीने खेळण्यास स्पष्ट नकार दिला होता. यावरून रितेश देशमुखने तिची चांगलीच शाळा घेतली होती.
advertisement
8/9
"हा अ‍ॅटिट्यूड तुमच्या घरी ठेवा, इथे सगळे सारखे आहेत. यावेळी नॉमिनेट केलंय, पुढच्या वेळी घराबाहेर काढेन," असा सज्जड दम रितेशने तिला भरला होता. दुर्दैवाने, रितेशचे ते शब्द आता खरे ठरले असून सोनालीला घराचा निरोप घ्यावा लागला आहे.
advertisement
9/9
सोनालीची एक्झिट खरोखरच झाली आहे की यात काही 'सिक्रेट रूम'चं ट्विस्ट आहे, हे आज रात्रीच्या भागात स्पष्ट होईल. 'बिग बॉस मराठी ६' चा हा रंगतदार सोहळा आज रात्री ८ वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहता येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'भाऊचा धक्का' भारी पडला! ग्लॅमरस अभिनेत्रीचा 'बिग बॉस'च्या घरातून पत्ता कट, रितेशच्या रागाचा फटका की प्रेक्षकांची नाराजी?