थिएटरमध्ये छप्परफाड कमाई, OTT वर ट्रेडिंग, आता ठरली 2025 मध्ये Google वर सर्वाधिक सर्च केलेली फिल्म?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Most Searched Movie In 2025 : 2025 या वर्षात गूगलवर सर्वाधिक सर्च केलेली फिल्म कोणती आहे? जाणून घ्या.
advertisement
1/7

2025 हे वर्ष मनोरंजनाच्या दृष्टीने खूपच सरप्राइजिंग ठरलं. या वर्षी बॉक्स ऑफिसवर आणि सोशल मीडियावर अशा चित्रपटांची चर्चा रंगली ज्याची कोणी अपेक्षाही केली नव्हती. 2025 या वर्षात गूगलवर सर्वाधिक सर्च केलेली फिल्म कोणती आहे? जाणून घ्या.
advertisement
2/7
2025 मध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेल्या काही चित्रपटांनी प्रेक्षकांना आश्चर्यचकित केलं आहे. तर काही मोठ्या स्टारकास्ट आणि मोठ्या बजेटच्या चित्रपटांनी मात्र प्रेक्षकांची तितकी मने जिंकली नाहीत. आता 2025 संपायला काहीच दिवस राहिले असताना, गूगलने Year In Search 2025 ही लिस्ट जाहीर केली आहे. त्यामुळे या वर्षात सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटांची नावे आता समोर आली आहेत.
advertisement
3/7
थिएटरमध्ये या वर्षी ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरचा ‘वॉर 2’ ते रजनीकांतचा ‘कुली’ हे चित्रपट रिलीज झाले. पण गूगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटांमध्ये मात्र हे मागे पडले आहेत.
advertisement
4/7
गूगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटाचं नाव ऐकूण तुम्हीची आश्चर्यचकित व्हाल. कारण ही फिल्म एवढी सुपरहिट ठरेल आणि चर्चेचा विषय बनेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूपच प्रेम दिलं, तसेच कथा, कलाकारांची कामगिरी आणि गाणीही खूप आवडली. मोहित सूरी दिग्दर्शित ‘सैयारा’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटातून अहान पांडेने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तर अनीत पड्डाची ही तिसरी फिल्म होती.
advertisement
5/7
'सैयारा' हा चित्रपट रिलीज होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली. अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले. आता 2025 मध्ये भारतात गूगलवर सर्वाधिक सर्च करणारा चित्रपट 'सैयारा' ठरला आहे. त्यामुळे आणखी एक रेकॉर्ड 'सैयारा'ने आपल्या नावे केला आहे.
advertisement
6/7
‘सैयारा’नंतर दुसऱ्या क्रमांकावर होता ऋषभ शेट्टी यांचा ‘कांतारा: चॅप्टर 1’. तर तिसऱ्या स्थानावर होता तमिळ सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘कुली’. यशराज फिल्म्सचा ‘वॉर 2’ चौथ्या स्थानावर राहिला, ज्यात ऋतिक रोशनसोबत ज्युनियर एनटीआर आणि कियारा आडवाणी दिसले. तर 2016 ची रोमँटिक ड्रामा ‘सनम तेरी कसम’ 2025 मध्ये पुन्हा रिलीज झाल्यानंतर सुपरहिट ठरला. फ्लॉपचा शिक्का असलेल्या या चित्रपटाला री-रिलिजनंतर प्रचंड प्रेम मिळाले आणि गूगलवरही याचा बऱ्याच प्रमाणात शोध घेतला गेला. सर्चमध्ये ही फिल्म पाचव्या क्रमांकावर राहिली आहे.
advertisement
7/7
6 व्या स्थानावर ‘मार्को’, 7 व्या स्थानावर ‘हाऊसफुल 5’, 8 व्या स्थानावर ‘गेम चेंजर’, 9 व्या स्थानावर ‘मिसेस’, 10 व्या स्थानावर अॅनिमेटेड फिल्म ‘महावतार नरसिन्हा’ या चित्रपटांनी जागा मिळवली. 2025 च्या सर्च ट्रेंडमधून एक गोष्ट स्पष्ट होते की प्रेक्षकांना फक्त मोठे सुपरस्टारच नव्हे, तर नवनव्या कथा आणि नव्या कलाकारांचे कामही आवडते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
थिएटरमध्ये छप्परफाड कमाई, OTT वर ट्रेडिंग, आता ठरली 2025 मध्ये Google वर सर्वाधिक सर्च केलेली फिल्म?