TRENDING:

मायलेकीची जोडी छोट्या पडद्यावर, ऋजुता देशमुखच्या लेकीचं TV वर पदार्पण

Last Updated:
अभिनेत्री ऋतुजा देशमुखची मुलगीही आता टेलिव्हिजनवर दिसणार आहे. दोघी मायलेकी एकाच चॅनेलवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
advertisement
1/7
मायलेकीची जोडी छोट्या पडद्यावर, ऋजुता देशमुखच्या लेकीचं TV वर पदार्पण
मायलेकीच्या अनेक जोड्या मनोरंजन विश्वात काम करताना दिसत आहेत. अशातच आता आणखी एक मायलेकीची जोडी छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्री ऋजुता देशमुख 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेतून अनेक वर्षांनी टेलिव्हिजनवर परतली आहे. मालिकेत ती पार्थ आणि जीवाच्या आईची भूमिका साकारत आहे.
advertisement
2/7
ऋजुता देशमुखला अनेक वर्षांनी टेलिव्हिजनवर पाहून प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला. ऋजुता देशमुखनंतर आता तिची मुलगीही टेलिव्हिजनवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली. 'बाई तुझ्यापाई' या सीरिजमधून ओटीटी विश्वात पदार्पण केल्यानंतर ऋजुता देशमुखची मुलगी साजिरी जोशी छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 
advertisement
3/7
स्टार प्रवाहच्या मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या तिन्ही पर्वांना प्रेक्षकांचं भरभरुन मिळालं. तीन हिट सीझननंतर मी होणार सुपरस्टारचा चौथा सीजन सज्ज आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले छोटे उस्ताद आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणार आहेत.
advertisement
4/7
नवोदित अभिनेत्री साजिरी जोशी या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडणार आहे. साजिरी नुकतीच एका सिनेमा आणि वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या गुणी अभिनेत्रीच्या अभिनयाचं सध्या सगळीकडेच कौतुक होत आहे. हाच गोडवा घेऊन ती छोट्या उस्तादांसोबत धमाल करणार आहे.
advertisement
5/7
'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 4' च्या निमित्ताने साजिरीची टीव्ही विश्वात एन्ट्री होतेय. याविषयी सांगताना साजिरी म्हणाली, "खूप उत्सुक आहे नवीन माध्यम जाणून घेण्यासाठी. मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद हा कमाल शो आहे."
advertisement
6/7
"चौथं पर्व मला होस्ट करायला मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. सगळेच स्पर्धक कमाल आहेत. त्यांची गाणी ऐकण्यासाठी, त्यांचं स्वप्न जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे."
advertisement
7/7
मी होणार सुपरस्टार सीझन 4 नव्या वर्षात 3 जानेवारीपासून रात्री 9 वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे. या शोमध्ये  सचिन पिळगावकर, आदर्श शिंदे, वैशाली सामंत जज म्हणून असणार आहेत.  
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मायलेकीची जोडी छोट्या पडद्यावर, ऋजुता देशमुखच्या लेकीचं TV वर पदार्पण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल