TRENDING:

अमेरिकन रॅपरला आवडली भारतीय कढी, 5000 किमीवरून ऑर्डर; डिलीव्हरीसाठीच 350000 रुपये, हवेतून पोहोचवली

Last Updated:
Man Paid Rs 350000 delivery charges for Indian Curry : अमेरिकन रॅपरने त्याची आवडती भारतीय कढी मागवली, त्यासाठी त्याने फक्त डिलीव्हरीसाठीच इतके पैसे मोजले की कदाचित त्या पदार्थाची किंमतही त्यापेक्षा कमी असावी.
advertisement
1/5
अमेरिकन रॅपरला आवडली भारतीय कढी; फक्त डिलीव्हरीसाठीच मोजले 350000 रुपये
प्रत्येकाला एखादा विशिष्ट पदार्थ विशिष्ट ठिकाणीच खायला आवडतो. असाच एक प्रसिद्ध अमेरिकन रॅपर ज्याला भारतीय कढी आवडली की त्याने ती तब्बल 5000 किलोमीटरवरून ऑर्डर केली. फक्त डिलीव्हरीसाठीच त्याने तब्बल 350000 रुपये मोजले.
advertisement
2/5
भारतीय जेवणाला तोडच नाही. अगदी जगभरात भारतीय पदार्थ आवडणारे कितीतरी लोक आहेत. याला अमेरिकन रॅपर कान्ये वेस्टही अपवाद नाही. त्याला भारतीय कढी आवडते आणि त्याच्यासाठी तो काहीही करू शकतो हे त्याने दाखवलं.
advertisement
3/5
कान्ये वेस्टला भारतीय कढी खावीशी वाटली, यासाठी त्याने तब्बल 5500 किलोमीटर दूर एका रेस्टॉरंटला ऑर्डर दिली. कान्ये यूएसच्या न्यूयॉर्कमध्ये आणि त्याने ज्या रेस्टॉरंटमधून ऑर्डर केली ते यूकेतील वेल्समध्ये.
advertisement
4/5
रेस्टॉरंटने कढी पॅक केली आणि आधी हेलिकॉप्टरने जवळच्या विमानतळावर पाठवली. जिथं ते पुढील ट्रान्सअटलांटिक फ्लाइटवर लोड केलं गेलं. वेळ इतकी अचूक होती की त्याच दिवशीच ताजी कढी न्यूयॉर्कमध्ये पोहोचली.
advertisement
5/5
ज्या रेस्टॉरंटकडे ही ऑर्डर आली त्या रेस्टॉरंटने अशा पद्धतीची आपल्याकडे आलेली ही सगळ्यात मोठी सेलिब्रिटी ऑर्डर असल्याचं सांगितलं. (प्रतीकात्मक फोटो)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
अमेरिकन रॅपरला आवडली भारतीय कढी, 5000 किमीवरून ऑर्डर; डिलीव्हरीसाठीच 350000 रुपये, हवेतून पोहोचवली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल