बॉलिवूडचा मोठा स्टार, पण अंत्यसंस्कारला फक्त 15 जणच; कारण काय?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Govardhan Asrani Funeral : बॉलिवूड इंडस्ट्री गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झालं. पण त्याच्या अंत्यसंस्काराला मात्र फक्त 15 लोक उपस्थित होते. असं का?
advertisement
1/11

प्रसिद्ध विनोदी कलाकार गोवर्धन असरानी यांचं 20 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी निधन झालं. त्यांनी वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्याच संध्याकाळी सांताक्रूझ स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.
advertisement
2/11
दिवाळीच्या रात्री आलेल्या या बातमीने सर्वांना धक्का बसला. त्यांच्या मृत्यूच्या अफवाही अलिकडेच समोर आल्या होत्या. सुरुवातीला चाहत्यांना ही अफवा वाटत होती. पण ही बातमी खरी ठरली.
advertisement
3/11
गोवर्धन असरानी यांनी त्यांच्या मृत्यूच्या काही तास आधी चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर त्यांनी खास पोस्ट लिहिली होती. त्यानंतर दिवाळीच्या संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
advertisement
4/11
गोवर्धन असरानी यांनी बॉलिवूडमध्ये खूप मोठं योगदान दिलं. बॉलिवूडचा मोठा स्टार मात्र त्यांच्या अंत्यसंस्काराला फक्त 15 लोक उपस्थित होते. असं का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अंत्यसंस्कारासाठी गर्दी करणारे बॉलिवूडकर असरानी यांच्यावेळेस कुठे राहिले?
advertisement
5/11
वृत्तानुसार, गोवर्धन असरानी गेल्या पाच दिवसांपासून रुग्णालयात होते. त्यांची प्रकृती बऱ्याच काळापासून बिघडत होती. त्यांच्या फुफ्फुसात द्रवपदार्थ जमा झाला होता. सोमवारी संध्याकाळी जुहू येथील आरोग्य निधी रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
advertisement
6/11
अहवालांनुसार, असरानी यांना शांतपणे या जगाचा निरोप घेतला. बॉलिवूडचा एक प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला अभिनेता पण त्यांना स्टारडमपासून दूर एक सामान्य नागरिक म्हणून जग सोडून जायचं होतं.
advertisement
7/11
त्यांनी त्यांच्या पत्नी मंजू यांना सांगितले होते की, त्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर कोणताही गोंधळ निर्माण करू नये. अंत्यसंस्कारानंतरच सर्वांना माहिती द्यावी. म्हणूनच त्यांचे अंत्यसंस्कार फक्त कुटुंबाच्या उपस्थितीत करण्यात आले.
advertisement
8/11
असरानी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात जास्त काळ काम करणाऱ्या विनोदी कलाकारांपैकी एक होते. पाच दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.
advertisement
9/11
1970 आणि 1980 च्या दशकात ते हिंदी चित्रपटसृष्टीत एक प्रमुख व्यक्तिरेखा करत होते. अनेकदा ते प्रेमळ मूर्ख, त्रासदायक कारकून किंवा विनोदी सहाय्यकाची भूमिका करत असत. त्यांच्या विनोदी वेळेमुळे आणि चेहऱ्यावरील हावभावांमुळे ते चित्रपट दिग्दर्शकांचे आवडते बनले.
advertisement
10/11
'शोले' आणि 'चुपके चुपके' सारख्या सिनेमातील त्यांची भुमिका लक्षात राहणारी आहे. 'शोले'मध्ये त्यांनी उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. हिटलरची नक्कल करणाऱ्या जेलरची भूमिका आजही तितकीच लोकप्रिय आहे.
advertisement
11/11
वेगवेगळ्या भाषांमध्ये काम केले असरानी यांनी गुजराती आणि राजस्थानीसह अनेक भाषांमध्ये काम केले.