TRENDING:

Govinda : बायकोच्या बडबडीला कंटाळला गोविंदा! मराठी अभिनेत्रीसोबत अफेअरच्या चर्चांवर पहिल्यांदाच बोलला, सगळं सांगून टाकलं

Last Updated:
Govinda on Extra Marital Affair Rumours : अभिनेता गोविंदाचं एका मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याच्या चर्चा गेली अनेक महिने सुरू आहेत. त्याची बायको सुनिता देखील अनेकदा याविषयी बोलली आहे. तिने गोविंदावर अनेक आरोपही केले. अखेर गोविंदाने या सगळ्यावर मौन सोडलं आहे.
advertisement
1/7
मराठी अभिनेत्रीसोबत अफेअरच्या चर्चांवर पहिल्यांदाच बोलला गोविंदा, सगळंच सांगितलं
अभिनेता गोविंदा आणि त्याची बायको सुनिता अहुजा यांचा नात्याची सातत्यानं चर्चा होत आहे. दोघांचा डिवोर्स होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. इतकंच नाही तर गोविंदाचं एका मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याचंही बोललं जातं आहे. सुनिताने अनेकदा यावर प्रतिक्रिया देत आपलं मतं मांडलं आहे. 
advertisement
2/7
सुनिता अहुजाने तिच्या युट्यूब व्हिडीओमधून अनेकदा नको नको ती बडबड केली आहे. यावर कधीच गोविंदा काहीच बोललेला नाही. पण अखेर त्याने पहिल्यांदाच मनातलं सर्वांसमोर सांगितलं आहे.  
advertisement
3/7
सुनीता आहुजाने 2025 हे वर्ष आपल्यासाठी अत्यंत वाईट ठरल्याचं सांगतिलं होतं. गोविंदाच्या कथित अफेअरबाबत सातत्यानं सुरू असलेल्या अफवांमुळे मानसिक त्रास झाल्याचंही तिनं सांगितलं होतं. गोविंदाने ANI शी बोलताना या प्रकरणावर आपली बाजू मांडली.
advertisement
4/7
गोविंदा म्हणाला, "मी माझ्या घरातील महिलांच्या विरोधात कधीच बोलत नाही. यामध्ये माझी आई आणि सासू सगळेच आले. माझ्या पत्नीने स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. जिथे ती विविध विषयांवर आपली मतं मांडते."
advertisement
5/7
गोविंदा पुढे म्हणाला, "माझ्या एका मित्राने मला सांगितलं होतं की माझ्याविरोधात अनेक वर्षांपासून कट रचला जात आहे. मी 15 वर्षांहून अधिक काळ शांत राहिलो. मला वाटायचं हे सगळं माझ्या नशिबामुळे होत आहे. मी प्रार्थना आणि अध्यात्मावर विश्वास ठेवतो. पण जेव्हा या गोष्टी कायम सुरू राहतात, तेव्हा कुणीतरी मुद्दाम हे करत आहे, असं वाटू लागतं."
advertisement
6/7
या कटामध्ये कुटुंबातील सदस्यांनाही त्यांच्या नकळत वापरलं जात असल्याचंही गोविंदानं सांगितलं. तो म्हणाला, "कधी कधी एखाद्याच्या नीट आखलेल्या कटाच्या प्रभावाखाली कुटुंबही येतं. प्रत्येकजण गोविंदा नसतो."
advertisement
7/7
सुनिता आणि तिच्या मागील काही वादग्रस्त वक्तव्यांविषयी बोलताना गोविंदा म्हणाला, "सुनीता सुशिक्षित आहे. ती कधीही अश्लील भाषा वापरत नाही. पण गेल्या काही दिवसांत जे काही पाहतो आहे ते निराशाजनक आहे. मी शांत राहतो म्हणून लोकांना वाटतं की मी कमकुवत आहे किंवा खरंच निर्दयी आहे. म्हणूनच आता मी बोलतो आहे".
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Govinda : बायकोच्या बडबडीला कंटाळला गोविंदा! मराठी अभिनेत्रीसोबत अफेअरच्या चर्चांवर पहिल्यांदाच बोलला, सगळं सांगून टाकलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल