TRENDING:

आधी मंदिरात पूजा, मग जीममध्ये रोमान्स, पांड्याने तिला थेट कडेवरच घेतलं, PHOTO तुफान व्हायरल

Last Updated:
हार्दिक पांड्या आणि नताशा 2024 मध्ये वेगळे झाले. हार्दिक सध्या माहिका सोबत रिलेशनमध्ये असून मालदीवमध्ये तिच्यासोबत वाढदिवस साजरा केला. आता दोघांचा जीममधील पोटो तुफान व्हायरल होतोय.
advertisement
1/8
आधी मंदिरात पूजा, मग जीममध्ये रोमान्स, पांड्याने तिला थेट कडेवरच घेतलं, PHOTO
क्रिकेटर हार्दिक पांड्या त्याच्या खेळाबरोबरच त्याच्या लव्ह लाइफमुळेही चर्चेत असतो. हार्दीक पांड्याने नताशाला डिवोर्स डिवोर्स दिल्यानंतर त्याचं नाव अनेक मॉडेल्स आणि अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. दरम्यान हार्दिक पांड्याने नुकतेच काही फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेत.
advertisement
2/8
या फोटोंमध्ये हार्दिक पांड्या त्याचा मुलगा अगस्त्य आणि त्याच्या पाळीव प्राण्यांबरोबर दिसतोय. या फोटोमध्ये त्याने आणखी एक फोटो शेअर केला आहे ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
advertisement
3/8
हार्दिक पांड्याने आधी गर्लफ्रेंडबरोबर पूजा केली. त्यानंतर जीममध्ये दोघांचा रोमान्स पाहायला मिळाला. पांड्याने त्याच्या गर्लफ्रेंडला थेट कडेवर घेतलं आहे. पांड्या आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
advertisement
4/8
स्टार क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये हार्दिक आणि माहिका एकत्र पूजा करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये हार्दिक माहिकाच्या गालावर किस करताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यांचे हे रोमँटीक फोटो पाहत असतानाच पुढचा फोटो तर भुवया उंचवायला भाग पाडतोय.
advertisement
5/8
हार्दिकने पोस्ट केलेल्या इतर फोटोंमध्ये दोघे वर्कआउट करताना मजा करताना दिसतात. एका सुंदर कॅन्डिड शॉटमध्ये हार्दिक माहिकाला कडेवर घेतलंय आणि माहिकाने मिरर सेल्फी क्लिक केला आहे. हा फोटो पाहून दोघांमधील रिलेशनचा अंदाज लागतोय.
advertisement
6/8
11 ऑक्टोबरला हार्दिक पांड्याने त्याचा 32 वा बर्थडे मालदीवमध्ये एका शांत आणि सुंदर बीचवर माहिकासोबत साजरा केला. हार्दिकच्या अलीकडील बहुतेक पोस्टमध्ये माहिका दिसत असल्याने, त्याने त्यांच्या रिलेशनला अधिकृत मान्यता दिल्याचे स्पष्ट होतंय. त्यांनी समुद्रकिनाऱ्यावर घेतलेल्या रोमँटिक फोटोंनाही चाहत्यांकडून पसंती मिळत आहे.
advertisement
7/8
2020 मध्ये कोरोना काळात हार्दिक आणि नताशा यांनी लग्न केलं होतं. लग्नाआधी ते लिव्हइनमध्ये राहत होते. दोघांना मुलगा देखील झाला. मुलगा मोठा होत असताना हार्दिक आणि नताशा यांनी 2024 मध्ये डिवोर्स घेतला.
advertisement
8/8
हार्दिकने डिवोर्सच्या निवेदनात सांगितलं होतं की, "चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर आम्ही परस्पर सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले, पण आमच्या दोघांच्याही हितासाठी हा निर्णय योग्य वाटला. आमचा मुलगा अगस्त्य आमच्या दोघांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू राहील."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आधी मंदिरात पूजा, मग जीममध्ये रोमान्स, पांड्याने तिला थेट कडेवरच घेतलं, PHOTO तुफान व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल