TRENDING:

अपघात, सर्जरी अन्... 2026 ठरणार सलमान खानसाठी सर्वांत भयंकर वर्ष! ज्योतिषाच्या भविष्यवाणीने वाढवली चिंता

Last Updated:
2026 Perditions for Salman Khan : सध्या सोशल मीडियावर सलमान खानच्या २०२६ या वर्षाबद्दलची एक मोठी ज्योतिषीय भविष्यवाणी प्रचंड व्हायरल होत आहे, जी त्याच्या चाहत्यांसाठी चिंताजनक ठरू शकते.
advertisement
1/8
2026 ठरणार सलमान खानसाठी सर्वांत भयंकर वर्ष! भविष्यवाणीने वाढवली चिंता
मुंबई: बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान याच्या आयुष्यातील प्रत्येक बातमी जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात. सध्या सोशल मीडियावर सलमान खानच्या २०२६ या वर्षाबद्दलची एक मोठी ज्योतिषीय भविष्यवाणी प्रचंड व्हायरल होत आहे, जी त्याच्या चाहत्यांसाठी चिंताजनक ठरू शकते.
advertisement
2/8
प्रसिद्ध ज्योतिषी सुशील कुमार सिंह यांनी एका पॉडकास्टमध्ये सलमान खानच्या भविष्याबद्दल भाष्य केले आहे. या भविष्यवाणीनुसार, येणारे वर्ष सलमानसाठी अत्यंत कठीण असणार आहे.
advertisement
3/8
सुशील कुमार सिंह यांनी दावा केला आहे की, "सलमान खानचा काळ खरोखर चांगला नाही. त्यांना आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागेल. इतकेच नाही तर "ते चित्रपटांमध्ये कोणताही चमत्कार करू शकणार नाहीत." त्यांनी असाही दावा केला की, सलमान खानला बॉलिवूडमधील आपले वर्चस्व आणि प्रभाव तात्पुरता गमवावा लागू शकतो.
advertisement
4/8
विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी दुसऱ्या एका ज्योतिषीनेही सलमान खानबद्दल अशीच शक्यता व्यक्त केली होती. ज्योतिषी गीतांजली सक्सेना यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच इशारा दिला होता की, "व्यावसायिकदृष्ट्या हे वर्ष त्यांच्यासाठी चांगले नाही. त्यांनी यावर्षी कोणताही नवीन चित्रपट रिलीज न करण्याचा प्रयत्न करावा."
advertisement
5/8
त्यांनी २०२६ बद्दल अधिक चिंता व्यक्त केली होती. त्या म्हणाल्या होत्या, "पुढील वर्षी एप्रिलनंतर त्यांना खूप सावध राहावे लागेल... हा एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया असू शकते... पण काही झाले तरी, ते यातून नक्कीच सावरतील."
advertisement
6/8
या भविष्यवाण्या अशा वेळी येत आहेत, जेव्हा सलमान खानने स्वतःच एका गंभीर आरोग्य समस्येबद्दल खुलासा केला होता. सलमानने नुकतेच 'ट्रायजेमिनल न्यूराल्जिया' नावाच्या वेदनादायक आजाराशी संघर्ष करत असल्याचे सांगितले होते.
advertisement
7/8
एका टॉक शोमध्ये त्याने सांगितले होते की, या आजारामुळे जेवण करणेही वेदनादायक झाले होते आणि त्याला नाश्ता संपवायला दीड तास लागायचा.
advertisement
8/8
सध्या सलमान खान 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे आणि 'बिग बॉस १९' चे सूत्रसंचालन करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अपघात, सर्जरी अन्... 2026 ठरणार सलमान खानसाठी सर्वांत भयंकर वर्ष! ज्योतिषाच्या भविष्यवाणीने वाढवली चिंता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल