TRENDING:

'ते गेले आता...' धर्मेंद्र यांच्या निधनानंतर चार दिवसांनी व्यक्त झाल्या हेमा मालिनी

Last Updated:
Hema Malini on Dharmendra : धर्मेंद्र यांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी हेमा मालिनी यांनी त्यांच्यासाठी खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त के
advertisement
1/7
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर 4 दिवसांनी व्यक्त झाल्या हेमा मालिनी
धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर 2025 रोजी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी हेमा मालिनी यांनी ट्वीट करत खास पोस्ट शेअर करत आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.
advertisement
2/7
हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतचे फोटो शेअर करत आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे,"धरमजी... हे माझ्यासाठी खूप काही होते. माझा प्रेमळ पती, आमच्या दोन मुली इशा आणि अहानचे लाडके वडील, मित्र, तत्त्वज्ञ, मार्गदर्शक, कवी, आणि मला गरज वाटेल अशावेळी माझा आधार. खरंतर ते माझ्यासाठ सगळंच होते".
advertisement
3/7
हेमा मालिनी यांनी लिहिलं आहे,"चांगल्या-वाईट काळात ते नेहमी माझ्या सोबत उभे राहिले. त्यांच्या सहज, आत्मीय वागण्यामुळे त्यांनी माझ्या संपूर्ण कुटुंबाचे मन जिंकले, त्यांच्यावर प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीचा वर्षाव केला".
advertisement
4/7
हेमा मालिनी यांनी पुढे लिहिलं आहे,"एक सार्वजनिक व्यक्तिमत्त्व म्हणून, त्यांची प्रतिभा, लोकप्रियतेनंतरही असलेली त्यांची विनम्रता अशासर्व गोष्टींमुळे ते एक अद्वितीय आणि अप्रतिम व्यक्ती होते".
advertisement
5/7
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर माझा झालेल्या जो वैयक्तिक लॉस आहे त्यांचं वर्णन करता येणार नाही. त्यांच्या जाण्याने माझ्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कधीच भरता येणार नाही. अनेक वर्षांच्या सहजीवनानंतर, आता माझ्याकडे फक्त आठवणीच उरल्या आहेत. आता फक्त या खास क्षणांना जपायचं आहे.
advertisement
6/7
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची जोडी रुपेरी पडद्यावर सुपरहिट ठरली. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता धर्मेंद्र यांनी 1980 मध्ये हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरा संसार थाटला.
advertisement
7/7
हेमा मालिनींच्या दु:खद पोस्टवर चाहते कमेंट्स करत शोक व्यक्त करत आहेत. त्यांनी शेअर केलेले धर्मेंद्र यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'ते गेले आता...' धर्मेंद्र यांच्या निधनानंतर चार दिवसांनी व्यक्त झाल्या हेमा मालिनी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल