इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री, तिला व्हायचंय देशाची पंतप्रधान; कारण ऐकून शॉक व्हाल
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Actress : पाकिस्तानी अभिनेत्रीने देशाचं पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपल्या सौंदर्यामुळे अभिनेत्रीची जगभरात चर्चा आहे.
advertisement
1/7

सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री त्यांच्या कामापेक्षा वादांमुळे अधिक लोकप्रिय असतात. या अभिनेत्री अनेकदा त्यांच्या अफेअर्समुळे चर्चेत राहतात. मेहविश हयात या अभिनेत्रीचा या यादीत समावेश आहे.
advertisement
2/7
पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयात आपल्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे ओळखली जाते. तिच्या अभिनयाने तिने पाकिस्तानच्या सिनेमा क्षेत्रात आपले विशेष स्थान निर्माण केले आहे.
advertisement
3/7
मेहविश हयात पाकिस्तानी सिने-क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक मानले जाते.
advertisement
4/7
मेहविशने 2015 मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. 'जवानी फिर नहीं आनी' या चित्रपटाच्या माध्यमातून तिने मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. तिचा पहिलाच चित्रपट पाकिस्तानमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.
advertisement
5/7
मेहविशने पुढे 'एक्टर इन लॉ', 'पंजाब नहीं जाऊंगी', 'लंडन नहीं जाऊंगा', 'लोड वेडिंग' यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली. या चित्रपटांच्या यशामुळे ती पाकिस्तान सिनेमा क्षेत्रातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली. मेहविश एका एपिसोडसाठी अंदाजे 8 लाख रुपये मानधन घेते. त्यामुळे पाकिस्तानातील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी मेहविश एक मानली जाते. अभिनेत्रीला पुढे बॉलिवूडच्याही ऑफर येऊ लागल्या.
advertisement
6/7
'फन्ने खां' या 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटासाठी ऐश्वर्या रायआधी मेहविश हयातला विचारणा झाली होती. परंतु भारत-पाकिस्तानमधील तणावामुळे आणि दोन्ही देशांमधील कलाकारांवरील निर्बंधांमुळे मेहविशला या भूमिकेसाठी दूर ठेवण्यात आले.
advertisement
7/7
मेहविश हयात राजकारणातही सक्रिय आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले की, एक दिवस पाकिस्तानची पंतप्रधान होऊ इच्छिते. तिने उदाहरण म्हणून इम्रान खान यांचे नाव घेतले, जे एक दिग्गज क्रिकेटपटू होते आणि नंतर पाकिस्तानचे पंतप्रधान बनले. मेहविशचे म्हणणे आहे की, "जर इम्रान खानसारखा क्रिकेटपटू पंतप्रधान होऊ शकतो, तर एक अभिनेता का नाही?" तिचे मत आहे की सामाजिक बदल घडवण्यासाठी कलाकारांनी राजकारणात प्रवेश करणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री, तिला व्हायचंय देशाची पंतप्रधान; कारण ऐकून शॉक व्हाल