Dharmendra : धर्मेंद्र यांचा ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील उपचारांचा खर्च किती? ICU च्या एका दिवसाच्या बिलाचा आकडा ऐकून व्हाल शॉक
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dharmendra Health Updates : गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील उच्च-सुविधा असलेल्या ब्रीच कँडी रुग्णालयात धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरू आहेत.
advertisement
1/8

मुंबई : बॉलिवूडचे लाडके आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल आज एक अत्यंत गंभीर बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील उच्च-सुविधा असलेल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल असलेल्या धर्मेंद्र यांची प्रकृती आज सकाळी अचानक खालावली.
advertisement
2/8
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे तातडीने व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.
advertisement
3/8
धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे, ज्यामुळे संपूर्ण देओल कुटुंब आणि बॉलिवूड इंडस्ट्रीवर मोठे चिंतेचे सावट पसरले आहे.
advertisement
4/8
धर्मेंद्र यांना सध्या ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. हे रुग्णालय दक्षिण मुंबईतील सर्वात महागड्या आणि अत्याधुनिक सुविधांसाठी ओळखले जाते.
advertisement
5/8
या रुग्णालयातील सुविधा उत्कृष्ट असल्या तरी, वैद्यकीय खर्चाचे आकडे खूप मोठे आहेत. हॉस्पिटलच्या अधिकृत माहितीनुसार, येथील रूम टॅरिफ लाखोंच्या घरात जातो.
advertisement
6/8
ICU मधील शुल्क: धर्मेंद्र यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे, जिथे २४ तास डॉक्टरांची टीम आणि उच्च देखरेख उपलब्ध असते. एका सामान्य आयसीयू कक्षाचा दररोजचा खर्चही ५०,००० ते १,००,००० च्या आसपास असतो. ज्येष्ठ अभिनेत्यासाठी असलेल्या व्हीआयपी किंवा डीलक्स रुमचा खर्च याहून अनेक पटीने जास्त असू शकतो.
advertisement
7/8
धर्मेंद्र यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती नाजूक असली तरी, त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांची टीम बारकाईने लक्ष ठेवून आहे.
advertisement
8/8
धर्मेंद्र यांच्या उपचारांसंबंधी कोणतीही अधिकृत माहिती अद्याप कुटुंब किंवा रुग्णालयाकडून देण्यात आलेली नाही, ज्यामुळे चाहत्यांची धाकधूक वाढली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dharmendra : धर्मेंद्र यांचा ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील उपचारांचा खर्च किती? ICU च्या एका दिवसाच्या बिलाचा आकडा ऐकून व्हाल शॉक