Hruta Durgule : सासूबाईंमुळे सुरु झाली हृता दुर्गुळेची लव्हस्टोरी; नवऱ्यासोबत अशी झाली पहिली भेट
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
मराठी मालिका आणि चित्रपटांमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. हृताचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. आज हृताच्या लग्नाचा वाढदिवस असून तिने नवऱ्यासाठी रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. पण या दोघांची लव्हस्टोरी कशी सुरु झाली तुम्हाला माहितीये का?
advertisement
1/8

हृता दुर्गुळेने यांनी 2022 मध्ये प्रतीक शाहशी लग्नगाठ बांधली. हृता आणि प्रतिक सोशल मीडियावर एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करतात.
advertisement
2/8
हृताने लग्नाला दोन वर्ष पूर्ण होताच प्रतिकसोबत एक खास फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
advertisement
3/8
हृताचा नवरा प्रतीक शाह एक प्रसिद्ध निर्माता आहे. तो मुख्यत्वे हिंदी मालिकाविश्वात कार्यरत आहे.
advertisement
4/8
हृता आणि प्रतीकची लव्हस्टोरी अभिनेत्रीच्या सासूमुळं सुरु झाली होती. हृताची सासू मुग्धा शाह या प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
advertisement
5/8
हृता आणि मुग्धा शाह यांनी 'दुर्वा' या मालिकेत पहिल्यांदाच एकत्र काम केलं होतं. हृताची ही पहिलीच मालिका होती. याचदरम्यान तिची प्रतिकसोबत भेट झाली होती.
advertisement
6/8
याविषयी बोलताना एका मुलाखतीत हृता म्हणाली होती की, 'मुग्धा शहामुळे माझी ओळख प्रतिकसोबत झाली. तेव्हा मुग्धाताईनं मला सांगितलं होतं की, माझा मुलगा प्रतिक हा शो सेटअप करतो. त्याच्या ओळखी आहेत. तू त्याच्यासोबत बोल. त्यानंतर आमचं कामानिमित्त बोलणं व्हायचं. त्यानंतर त्यानं मला लग्नाबद्दल विचारलं.'
advertisement
7/8
अशा प्रकारे हृता आणि प्रतीकने 18 मे 2022 रोजी लग्नगाठ बांधत सुखी आयुष्याला सुरुवात केली.
advertisement
8/8
हृताची सासू मुग्धा शहा या देखील अभिनेत्री आहेत. मराठी, हिंदी आणि गुजराती मालिकांमध्ये मुग्धा शहा यांनी काम केलं आहे. तसेच मिस मॅच, कर्तव्य, माहेर माझं पंढरपूर या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Hruta Durgule : सासूबाईंमुळे सुरु झाली हृता दुर्गुळेची लव्हस्टोरी; नवऱ्यासोबत अशी झाली पहिली भेट