'कोणासोबत झोपायचं ही माझी मर्जी', हे काय बोलून गेली भारताची नंबर 1 हिरोईन? बोल्ड स्टेटमेंटची जगात चर्चा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
दीपिका पादुकोणने 'माय चॉईस' व्हिडिओत महिलांच्या निवडीच्या अधिकारावर ठाम मत मांडले, ज्यामुळे वाद झाला. ती रणवीर सिंहची पत्नी आणि 'दुआ'ची आई आहे.
advertisement
1/8

मुंबई: बॉलिवूडमध्ये सध्या सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक असलेल्या अभिनेत्रीने काही वर्षांपूर्वी लग्न, नातेसंबंध आणि महिलांच्या अधिकारांवर दिलेले एक अत्यंत बोल्ड आणि थेट विधान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आज ती पत्नी आणि एका गोंडस मुलीची आई आहे, पण लग्नापूर्वी तिने दिलेले हे स्टेटमेंट अनेकांच्या भुवया उंचावून गेले होते.
advertisement
2/8
दीपिका पादुकोण तिच्या फिल्मी करिअरइतकीच तिच्या लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत राहिली. कधी तिचे नाव क्रिकेटपटू युवराज सिंह किंवा एम एस धोनीसोबत जोडले गेले, तर अभिनेता रणबीर कपूरसोबतचे तिचे नाते तर जगजाहीर होते. या दोघांचे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही आणि ब्रेकअपनंतर दीपिका खूप खचली होती, असे म्हटले जाते.
advertisement
3/8
मात्र, २०१५ मध्ये दीपिकाने 'माय चॉईस' नावाच्या एका व्हिडिओ कॅम्पेनमध्ये सहभागी होऊन महिला सबलीकरणावर अत्यंत स्पष्ट आणि बेधडक मत मांडले.
advertisement
4/8
२०१५ मध्ये 'वोग' मॅगझीनसाठी बनवलेल्या आणि होमी अदजानिया यांनी दिग्दर्शित केलेल्या या २ मिनिटे ३४ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये दीपिकाने अनेक महिलांसोबत आवाज उठवला होता.
advertisement
5/8
या व्हिडिओमध्ये दीपिकाने म्हटले होते की, "मला माझ्या आवडीनुसार आयुष्य जगायचं आहे. मला हवे तसे कपडे घालायचे आहेत. पुरुष असो वा स्त्री, कोणावर प्रेम करायचे, ही माझी मर्जी आहे."
advertisement
6/8
सर्वात महत्त्वाचे आणि ज्यामुळे मोठा वाद झाला, ते विधान करताना दीपिका म्हणाली होती, "लग्नाआधी कोणासोबत शारीरिक संबंध करायचे, लग्नानंतर करायचे की नाही करायचे, हे देखील माझ्यावर अवलंबून आहे." या 'बोल्ड' स्टेटमेंटनंतर समाजात दोन गट पडले. अनेकांनी दीपिकाला पाठिंबा दिला, तर अनेकांनी तिच्यावर तीव्र टीका केली.
advertisement
7/8
टीका वाढल्यानंतर दीपिकाने एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सफाई दिली होती. तिने स्पष्ट केले की, कोणालाही दुखावण्याचा तिचा उद्देश नव्हता. तिचा विवाह आणि नात्यांवर पूर्ण विश्वास आहे आणि ती या गोष्टींना पवित्र मानते. तिचे म्हणणे केवळ महिलांच्या 'निवडीच्या अधिकारावर' होते, असे तिने सांगितले.
advertisement
8/8
या वादानंतर २०१८ मध्ये दीपिकाने रणवीर सिंहसोबत इटलीमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले आणि नुकतीच ती 'दुआ' नावाच्या गोंडस मुलीची आई बनली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'कोणासोबत झोपायचं ही माझी मर्जी', हे काय बोलून गेली भारताची नंबर 1 हिरोईन? बोल्ड स्टेटमेंटची जगात चर्चा