TRENDING:

सूरजचं लग्न लावून जान्हवी थेट हॉस्पिटलमध्ये,'किलर गर्ल'ला नेमकं झालेलं काय? दिली हेल्थ अपडेट

Last Updated:
Jahnavi Killekar Health Update : अभिनेत्री जान्हवी किल्लेकरला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.जान्हवीला नेमकं काय झालं होतं हे तिने सांगितलं.
advertisement
1/8
सूरजचं लग्न लावून जान्हवी थेट हॉस्पिटलमध्ये, 'किलर गर्ल'ला नेमकं झालेलं काय?
अभिनेत्री जान्हवी किल्लेकर बिग बॉस मराठी 5चा विजेता सूरज चव्हाणच्या लग्नाला गेली होती. सूरजच्या लग्नात जान्हवी करवली म्हणून मिरवली. लग्नात तिनं खूप धम्माल केली. पण लग्न लावून घरी आली आणि जान्हवी थेट हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. तिची तब्येत बिघडल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
advertisement
2/8
जान्हवी आता बरी झाली असून तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पण जान्हवी नेमकं काय झालं होत? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. जान्हवीने स्वत: व्हिडीओ शेअर करत तिची हेल्थ अपडेट दिली आहे. 
advertisement
3/8
व्हिडीओ शेअर करत जान्हवी म्हणाली, "हाय हॅलो नमस्कार! व्हिडिओ बनवण्यामागचं कारण की, आता माझी तब्येत एकदम उत्तम आहे. मी पूर्णपणे बरी झाली आहे. फार काही झालं नव्हतं. खरतंर बरेच दिवस शूटिंग, इव्हेंट्स होते, सूरजचं लग्न होतं त्यामुळे खूप धावपळ आणि दगदग झाली. मी खूप प्रवास झाला आणि जेवणाच्या वेळा चुकल्या. तसंच झोप पूर्ण झाली नाही."
advertisement
4/8
"सूरजच्या लग्नात मी खूप नाचले, खूप मजा केली. त्यामुळे जरा थकवा आला होता. मला लो बीपीचाही त्रास आहे. अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. पण मला संपूर्ण महाराष्ट्राला धन्यवाद म्हणायचं आहे, तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात सूरजच्या लग्नाला आलात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माणसं आली होती फक्त त्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी."
advertisement
5/8
सूरजच्या लग्नाविषयी बोलताना जान्हवी म्हणाली, "आज सूरजचे आई-बाबा या जगात नाहीयेत पण मला हे सांगताना अभिमान वाटतोय की, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून माणसं आलेली. जे त्याचे आई, बाबा, बहीण, भाऊ, मित्र बनून आले होते. हे खूप कौतुकास्पद आहे आणि असं नशीब फार कमी लोकांना मिळतं. जे आमच्या सूरजला मिळालं आहे. खरंच मी महाराष्ट्रातील सगळ्या लोकांचे खूप खूप आभार मानेल की तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात सूरजच्या लग्नात त्याला आशीर्वाद देण्यासाठी आलात."
advertisement
6/8
"खूप मजा आली मला सूरजच्या लग्नात. त्यांच्या इथले रितीरिवाज मला कळले, काही पद्धती आमच्याकडे होत नाहीत त्या त्यांच्याकडे होतात. प्रत्येक विधी मी एन्जॉय केल्या, खूप मजा आली. खूप नाचले, धमाल केली मी."
advertisement
7/8
जान्हवी पुढे म्हणाली, "सूरज आणि माझं बॉण्डिंग आता इतकं घट्ट झालंय की, मी प्रत्येक विधीला सोबत होतो. खरंच हा अविस्मरणीय क्षण होता माझ्या आयुष्यातला."
advertisement
8/8
"सूरजसोबत मलाही प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. बरेच नवीन मित्र मिळाले. सूरजच्या बहिणी मला मला माझ्या बहिणींसारख्याच झाल्या. अनेक नवी नाती मला मिळाली, वेगवेगळ्या विधी समजल्या. एकंदरीत मी सूरजच्या लग्नात खूप मज्जा केली. थँक्यू सो मच महाराष्ट्राला मी खरंच धन्यवाद म्हणेन की तुम्ही इतकं प्रेम करता. मी आता पूर्णपणे ठीक आहे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सूरजचं लग्न लावून जान्हवी थेट हॉस्पिटलमध्ये,'किलर गर्ल'ला नेमकं झालेलं काय? दिली हेल्थ अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल