TRENDING:

'जय जय स्वामी समर्थ' मालिकेनं गाठला 900 भागांचा टप्पा! भक्तांना घडणार महाराजांच्या महाकाय महादेव रूपाचे दर्शन

Last Updated:
जय जय स्वामी समर्थ या मालिकेचा येणारा भाग खूप खास असणार आहे. मालिकेत स्वामींच्या एका अद्भूत रूपाचं दर्शन होणार आहे.
advertisement
1/7
जय जय स्वामी समर्थ! भक्तांना घडणार महाराजांच्या महाकाय महादेव रूपाचे दर्शन
कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका अनेक घरांमध्ये आवर्जून पाहिली जाते. मालिकेत आजवर स्वामी प्रतिचीची अनेक उदाहरणं दाखवण्यात आली आहेत.
advertisement
2/7
मालिकेतील प्रत्येक एपिसोड हा पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून जाणारा असतो. दरम्यान मालिकेत आता स्वामींचा एक महत्त्वाचा अवतार पाहायला मिळणार आहे
advertisement
3/7
मालिकेच्या येणाऱ्या भागात भक्तांना स्वामी समर्थांच्या महाकाय महादेव रूपाचे दर्शन होणार आहे. 15 सप्टेंबर 2023 रोजी हा भाग प्रदर्शित होणार आहे.
advertisement
4/7
मालिकेत आजवर स्वामींची अनेक रूपं दाखवण्यात आली आहेत. त्यातील महाकाय महादेव रूपातील स्वामींचं रूप पाहायला मिळणार आहे.
advertisement
5/7
'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत अभिनेता अक्षय मुदवडकर यानं स्वामींची प्रमुख भुमिका साकारली आहे. नुकतेच मालिकेनं तब्बल 900 भाग पूर्ण केले आहेत.
advertisement
6/7
मालिकेच्या संपूर्ण टीमनं 900 भागांचं उत्साहात सेलिब्रेशन केलं. सेलिब्रेशनमध्ये स्वामींच्या नावाचा जयजयकार देखील करण्यात आला.
advertisement
7/7
मागील 4 वर्षांपासून जय जय स्वामी समर्थ ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. स्वामींची विविध रूप, भक्तांच्या हाकेला धावून जाणाऱ्या स्वामींचा महिमा सांगणाऱ्या या मालिकेला प्रेक्षकांचं उदंड प्रेम मिळालं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'जय जय स्वामी समर्थ' मालिकेनं गाठला 900 भागांचा टप्पा! भक्तांना घडणार महाराजांच्या महाकाय महादेव रूपाचे दर्शन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल