TRENDING:

एका एपिसोडसाठी 18 लाख, 23व्या वर्षी 250 कोटींची मालकीण; TV अभिनेत्रीनं फॉलोअर्समध्ये SRKलाही टाकलं मागे

Last Updated:
TV Actress : टेलिव्हिजनवर काम करणाऱ्या कलाकारांना नेहमीच चांगलं मानधन मिळत आलं आहे असं म्हटलं जातं. अशीच एक अभिनेत्री आहे जिचं आता वय फक्त 23 वर्ष आहे. या वयात ती 250 कोटींची मालकीण आहे. तिचे इन्स्टाग्रामवरचे फॉलोअर्स शाहरुख खानपेक्षा जास्त आहेत. 
advertisement
1/8
एका एपिसोडसाठी 18 लाख, TV अभिनेत्री 23व्या वर्षी 250 कोटींची मालकीण
ही अभिनेत्री टेलिव्हिजन क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.  इतक्या लहान वयात तिने तिचे जबरदस्त फॅन फॉलोविंग तयार केली आहे. 
advertisement
2/8
जन्नत जुबैर या अभिनेत्रीबद्दल आपण बोलत आहोत. जन्नतने आतापर्यंत अनेक टीव्ही आणि रिअॅलिटी शोमध्ये काम केले आहे. अवघ्या 23 वर्षांच्या वयात तिने असे स्टारडम मिळवले आहे जे फार कमी लोक मिळवू शकतात.
advertisement
3/8
शाहरुख खानचे चाहते केवळ भारतातच नाही तर परदेशातही आहेत. इंस्टाग्रामवर त्याचे 48.5 मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत. जन्नत जुबैरचे फॉलोअर्स शाहरुख खानपेक्षाही जास्त आहेत. तिला इंस्टाग्रामवर 50.3 मिलियन लोक फॉलो करतात.
advertisement
4/8
जन्नत जुबैरचा जन्म 29 ऑगस्ट 2001 रोजी मुंबईत झाला. तिने टेलिव्हिजनमध्ये बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. आता ती नामांकित कलाकारांपैकी एक आहे. 
advertisement
5/8
जन्नत जुबैरनं 'दिल मिल गये', 'काशी: अब ना रहे तेरा कागज कोरा', 'फुलवा', 'महाराणा प्रताप', 'तू आशिकी' आणि 'फियर फाइल्स' सारख्या टेलिव्हिजन शोमध्ये काम केले आहे. ती राणी मुखर्जीच्या 'हिचकी' सिनेमातही दिसली आहे. 
advertisement
6/8
जन्नतने 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 12' आणि 'स्माइलिंग शेफ' सारख्या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला आहे. तिने अनेक म्युझिक अल्बममध्येही काम केलं आहे. जन्नत ही 'खतरों के खिलाडी' या शोमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक होती.
advertisement
7/8
खतरो के खिलाडीच्या एका एपिसोडसाठी तिला 1.8कोटी रुपये फी मिळत होती अशी माहिती आहे. 'स्मायलिंग शेफ' च्या एका एपिसोडसाठी तिला 2,00,000 रुपये मिळाले. ती प्रत्येक सोशल मीडिया पोस्टसाठी दीड ते दोन लाख रुपये घेते. 
advertisement
8/8
जन्नत जुबैरने वयाच्या 21व्या वर्षी मुंबईत स्वतःचं घर खरेदी केलं. ती केवळ एक अभिनेत्रीच नाही तर एक यशस्वी व्यावसायिक महिला देखील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जन्नतची एकूण संपत्ती अंदाजे 250 कोटी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
एका एपिसोडसाठी 18 लाख, 23व्या वर्षी 250 कोटींची मालकीण; TV अभिनेत्रीनं फॉलोअर्समध्ये SRKलाही टाकलं मागे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल