TRENDING:

Jui Gadkari : रोहिणी हट्टगंडींना पूर्णा आजीच्या लुकमध्ये पाहून भारावली जुई गडकरी, म्हणाली, 'आमच्या सेटवर...'

Last Updated:
Jui Gadkari on New Poorna Aaji : ठरलं तर मग मालिकेत अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी या नव्या पूर्णा आजी म्हणून आल्या आहेत. नव्या पूर्णा आजीला मालिकेत पाहून जुई गडकरी भारावली.
advertisement
1/10
रोहिणी हट्टगंडींना पूर्णा आजीच्या लुकमध्ये पाहून भारावली जुई गडकरी
ठरलं तर मग मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे मालिकेत पूर्ण आजी परत आली आहे.
advertisement
2/10
ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आताॉ पूर्णा आजींची भूमिका साकारणार आहे. पूर्णा आजी परत आल्याने मालिका आता नवं वळण घेणार आहे.
advertisement
3/10
ठरलं तर मग मालिका गेली तीन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतल्या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय.
advertisement
4/10
काही दिवसांपूर्वीच पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांचं निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला.
advertisement
5/10
ठरलं तर मगच्या टीमलाही ज्योती ताई आपल्यातून निघून गेल्याचं दु:ख पचवणं आजही अवघड जातंय. पण शो मस्ट गो ऑन....गेले कित्येक दिवस पूर्णा आजी या पात्राला प्रेक्षक मिस करत होते.
advertisement
6/10
प्रेक्षकांच्या इच्छेखातर पूर्णा आजी पुन्हा आपल्या भेटीला येणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी पूर्णा आजीची भूमिका साकारणार आहेत.
advertisement
7/10
पूर्णा आजीच्या एण्ट्रीने सेटवरही आनंदाचं वातावरण आहे. सगळ्या टीमने मिळून रोहिणी ताईंचं मनापासून स्वागत केलं आहे.
advertisement
8/10
सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली, "पूर्णा आजीच्या रुपात रोहिणी ताईंना पाहून खूप भरुन आलं."
advertisement
9/10
"रोहिणी ताईंसोबत काम करताना खूप गोष्टी शिकायला मिळणार आहेत. त्यांच्या रुपात विद्यापीठच आमच्या सेटवर आलंय."
advertisement
10/10
"रोहिणी ताई म्हणजेच पूर्णा आजीसोबत आता मालिकेची गोष्ट पुढे नेताना आनंद होतोय", असंही जुई म्हणाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Jui Gadkari : रोहिणी हट्टगंडींना पूर्णा आजीच्या लुकमध्ये पाहून भारावली जुई गडकरी, म्हणाली, 'आमच्या सेटवर...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल