सोलापूर - सोलापूर शहरातील उच्चशिक्षित तरुणी दिवाळीत घरगुती चव असलेला फराळ विक्री व्यवसाय करता असून 20 दिवसांमध्ये 8 ते 10 लाख रुपयांची उलाढाल करत आहे. पिंकी कुमावत असे या उच्चशिक्षित तरुणीचे नाव आहे. घरगुती चव असलेली दर्जेदार फराळ ग्राहकांसाठी तयार करून उपलब्ध करून दिले आहे. या संदर्भात अधिक माहिती उच्चशिक्षित तरुणी पिंकी कुमावत यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.