कापूर कशापासून बनतो? पुजेला वापरला जाणाऱ्या या सुगंधी पदार्थामागचं विज्ञान क्वचित कोणाला माहित असेल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
सुगंधाने वातावरण भारून टाकणारा कापूर पाहून तुम्हालाही कधी प्रश्न पडला का हा कापूर शेवटी बनतो कशापासून? आणि इतक्या झपाट्याने का जळतो? चला तर जाणून घेऊ या त्यामागचं विज्ञान.
advertisement
1/7

आपल्या भारतीय सणांमध्ये पूजा-पाठ, आरती किंवा धार्मिक विधींमध्ये कापूर हा घटक नेहमीच असतो. आरती सुरू होण्याआधी माचिसची काडी लागली की क्षणात पेटणारा आणि सुगंधाने वातावरण भारून टाकणारा कापूर पाहून तुम्हालाही कधी प्रश्न पडला का हा कापूर शेवटी बनतो कशापासून? आणि इतक्या झपाट्याने का जळतो? चला तर जाणून घेऊ या त्यामागचं विज्ञान.
advertisement
2/7
कापूर बनतो कशापासून?बाजारात दोन प्रकारचा कापूर मिळतो नैसर्गिक (Natural) आणि कृत्रिम (Artificial).नैसर्गिक कापूर ‘कॅम्फर’ नावाच्या झाडापासून तयार केला जातो. या झाडाचं शास्त्रीय नाव आहे Cinnamomum camphora. हे झाड सुमारे 50 ते 60 फूट उंच वाढतं आणि त्याची पाने गोलाकार, सुमारे 4 इंच रुंद असतात.
advertisement
3/7
या झाडाच्या सालेमधून (bark) कापूर तयार केला जातो. साल कोरडी होऊ लागली की तिचा रंग थोडा भुरकट-करडा दिसतो. नंतर ही साल झाडापासून वेगळी करून उकळवली जाते आणि त्यातील घटक पदार्थ रिफाइन केले जातात. त्यानंतर त्याचं पावडरमध्ये रूपांतर केलं जातं आणि मग त्याला कापूरच्या आकारात घडवलं जातं.
advertisement
4/7
कॅम्फरचं झाड कुठे आढळतं?कॅम्फरचं झाड प्रामुख्याने पूर्व आशियात, विशेषतः चीन आणि जपानमध्ये आढळतं. जपान हे या झाडाचं मूळस्थान मानलं जातं. चीनमध्ये प्राचीन काळापासून लोक औषध पद्धतींमध्ये या झाडाचा वापर केला जातो.इ.स. 9व्या शतकात प्रथमच या झाडातून कापूर तयार करण्यात आला आणि पुढे तो जगभर प्रसिद्ध झाला.
advertisement
5/7
भारतात कापूर कसा आला?1932 मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनपत्रानुसार, कलकत्त्याच्या स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनमधील आर.एन. चोप्रा आणि बी. मुखर्जी यांनी नमूद केलं आहे की 1882-83 च्या सुमारास लखनौ येथील उद्यानात कापूराची यशस्वी शेती करण्यात आली होती. जरी ही यशस्वी शेती काही काळच टिकली, तरी काही वर्षांनी भारतात मोठ्या प्रमाणावर कॅम्फर झाडांची लागवड सुरू झाली.
advertisement
6/7
कापूर इतक्या लवकर का जळतो?कापूरमध्ये कार्बन आणि हायड्रोजनचे प्रमाण जास्त असतं. त्यामुळे त्याचं ज्वलन तापमान (ignition temperature) खूप कमी असतं. म्हणजेच अगदी थोड्याशा उष्णतेतही तो सहज पेट घेतो. कापूर जळताना त्याची वायू स्वरूपातील वाष्पं (vapours) झपाट्याने हवेत मिसळतात आणि वातावरणातील ऑक्सिजनशी प्रतिक्रिया देऊन तो लगेच प्रज्वलित होतो. म्हणूनच कापूरला माचिस लागताच क्षणात पेटतो आणि सुगंध दरवळतो.
advertisement
7/7
कापूर केवळ धार्मिक कारणांसाठी नाही, तर त्याच्यामागे एक वैज्ञानिक प्रक्रिया आणि नैसर्गिक झाडाचा स्रोत दडलेला आहे. म्हणून पुढच्या वेळी आरतीच्या ज्योतीत कापूर जळताना पाहिलात, तर लक्षात ठेवा त्यामागे निसर्ग, विज्ञान आणि श्रद्धा या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
कापूर कशापासून बनतो? पुजेला वापरला जाणाऱ्या या सुगंधी पदार्थामागचं विज्ञान क्वचित कोणाला माहित असेल