TRENDING:

Kacha Badam Singer : ज्या गाण्यामुळे मिळाली प्रसिद्धी ते गाणंच गेलं चोरीने, कच्चा बादाम फेम भूबनसोबत मोठा गफला; नेमकं प्रकरण काय?

Last Updated:
Kacha Badam Singer Bhuban Badyakar : 'कच्चा बादाम' या सुपरहिट गाण्याचे गायक भुबन बड्याकर यांचा संघर्षमय प्रवास राहिला आहे. 'कच्चा बादाम'ने त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली असली तरी या गाण्याचे हक्क मात्र त्यांच्याकडून काढून घेण्यात आले आहेत.
advertisement
1/7
कच्चा बादाम फेम भूबनसोबत मोठा गफला; नेमकं प्रकरण काय?
1. 'कच्चा बादाम' या गाण्याने प्रसिद्ध झालेल्या गायक भुबन बड्याकर यांची कहाणी खूपच संघर्षमय आहे. 'कच्चा बादाम' या गाण्याने ते रातोरात सुपरस्टार झाले. पण आज या गाण्याचे अधिकार मात्र त्यांच्याकडून काढून घेण्यात आले आहेत. प्रत्येकाच्या मनाला आज त्यांची कथा स्पर्शून जाते.
advertisement
2/7
पश्चिम बंगालमधील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या भुबन बड्याकर या सर्वसामान्य माणसाने कधी रस्त्याच्या कडेला सायकलवरून शेंगदाणे विकले आहेत.
advertisement
3/7
भूबन नुकतेच यूट्यूबर निशू तिवारी यांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाले,"कच्चा बादाम' ही धून किती साधी पण हृदयस्पर्शी आहे. ते हसत हसत म्हणाले, "मी शेंगदाणे विकायचो आणि लोक माझा मोबाईल चोरून नेत असत. म्हणून मी विचार केला की यावरच एक गाणं तयार करावं. लोक ऐकतील, हसतील आणि कदाचित विचारही करतील."
advertisement
4/7
एका व्यक्तीने भूबन बड्याकर यांचं गाणं रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकलं आणि काही दिवसांतच ते इतकं व्हायरल झालं की भुबन बड्याकर हे नाव प्रत्येकाच्या ओठांवर होतं. बंगालच्या गल्ल्यांतील झोपडीत राहणारा भूबनच्या आवाजाने बॉलिवूडलाही भूरळ पाडली. आज ते झोपडीत राहत नाहीत तर स्वत:च्या हक्काच्या घरात राहतात.
advertisement
5/7
'कच्चा बादाम'ने आर्थिक फायदा झाला का याबाबत प्रामाणिकपणे बोलताना भूबन बड्याकर म्हणाले,"मुंबईत 60-70 हजार, कोलकोत्यामध्ये एक लाख मिळाले. पण आता या गाण्याचा कॉपीराइट माझ्याकडे नाही". त्यांनी सांगितले की काही लोक मोठमोठ्या वचनांसह आले, त्यांनी काही कागदांवर सह्या करून घेतल्या आणि 'कच्चा बादाम' चे हक्क स्वतःकडे घेतले. त्यामुळे या गाण्याने मला प्रसिद्धी पण दिली आणि फसवलंदेखील".
advertisement
6/7
भूबन पुढे म्हणाले,"आता लोक मला ओळखतात, माझ्याबरोबर फोटो काढतात, बोलावतात हीच माझी सगळ्यात मोठी कमाई आहे".
advertisement
7/7
सायकलवरून शेंगदाणे विकणारे भूबन आता स्टेजवर परफॉर्म करतात, टीव्ही शोमध्ये झळकतात आणि लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Kacha Badam Singer : ज्या गाण्यामुळे मिळाली प्रसिद्धी ते गाणंच गेलं चोरीने, कच्चा बादाम फेम भूबनसोबत मोठा गफला; नेमकं प्रकरण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल