बॉलिवूडचा फेमस अभिनेता, ज्याच्या प्रेमात पडली मराठमोळी अभिनेत्री, पोटच्या पोराला कुशीतही घेऊ शकली नाही
- Published by:Minal Gurav
Last Updated:
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री जी एका बॉलिवूडच्या विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पडली. तिचं नशीब इतकं वाईट की तिचा संसार फार वर्ष टिकला नाही. पोटच्या मुलाला ती कुशीतही घेऊ शकली नाही.
advertisement
1/12

अशा अनेक मराठी अभिनेत्री आहेत ज्यांनी बॉलिवूड अभिनेत्याशी लग्न केलं. काहींनी सुखाचा संसार थाटला तर काहींचे संसार मोडले.
advertisement
2/12
अशीच एक मराठी अभिनेत्री जिनं बॉलिवूडच्या हँडसम पण विवाहित अभिनेत्याशी लग्न केलं. लग्नानंतर दोघांनी संसार केला.
advertisement
3/12
पण अभिनेत्रीचं नशीब इतकं वाईट की तिला पोटच्या मुलाला कुशीतही घेता आलं नाही.
advertisement
4/12
आपण बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजेच स्मिता पाटील. आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या स्मिताचं वैयक्तिक आयुष्य मात्र अनेक टिका टिप्पण्यांनी भरलेलं होतं.
advertisement
5/12
स्मिता पाटील या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. आपल्या करिअरमध्ये तिने 80 अधिक सिनेमात काम केलं.
advertisement
6/12
स्मिता पाटील यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1955 रोजी पुण्यात आला. 1974 साली मेरे साथ चल या चित्रपटातून तिने पदार्पण केलं. ‘चरणदास चोर’ हा तिचा पहिला महत्त्वाचा चित्रपट होता. ज्याच दिग्दर्शन श्याम बेनेगल यांनी केलं होतं.
advertisement
7/12
स्मिताने मराठीसह हिंदी आणि साऊथमध्येही काम केलं. भूमिका आणि चक्र या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
advertisement
8/12
स्मिता पाटील अभिनेता राज बब्बरच्या प्रेमात पडली. राज तेव्हा विवाहित आणि दोन मुलांचे वडील होते. स्मिता आणि राज यांनी लग्न केलं. स्मिताला त्यावेळेस होम ब्रेकर म्हटलं गेलं होतं.
advertisement
9/12
राज आणि स्मिता यांना एक मुलगा झाला. प्रतीक बब्बर असं त्याचं नाव असून आज तो अभिनेता म्हणून इंडस्ट्रीत काम करतोय.
advertisement
10/12
स्मिता पाटीलनं मुलगा प्रतीकला जन्म दिला आणि त्याच्या काही दिवसांत तिचं निधन झालं. 13 डिसेंबर 1986 रोजी वयाच्या फक्त 31 व्या वर्षी स्मिताचं निधन झालं.
advertisement
11/12
मुलगा प्रतीकच्या जन्मानंतर 15 दिवसांनी स्मिताने या जगाचा निरोप घेतला. डिलिव्हरीनंतर झालेल्या व्हायरल इन्फेक्शनमुळे स्मिताला जीव गमवावा लागला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली होती.
advertisement
12/12
शेवटच्या दिवसांत स्मिताची परिस्थिती इतकी वाईट होती की तिला तिच्या पोटच्या मुलाला कुशीतही घेता येत नव्हतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बॉलिवूडचा फेमस अभिनेता, ज्याच्या प्रेमात पडली मराठमोळी अभिनेत्री, पोटच्या पोराला कुशीतही घेऊ शकली नाही