TRENDING:

The Trial S2 : तमन्ना भाटियानंतर काजोलनेही तोडली 'नो किसिंग पॉलिसी', ऑनस्क्रीन लिपलॉक करतानाचा VIDEO VIRAL

Last Updated:
Kajol The Trial Series : काजोलने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं, तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितलं होतं की, ती चित्रपटांमध्ये कधीही किसिंग सीन देणार नाही. तिने तिच्या २९ वर्षांच्या करिअरमध्ये कधीच असे सीन केले नाहीत.
advertisement
1/7
तमन्ना भाटियानंतर काजोलनेही तोडली 'नो किसिंग पॉलिसी', लिपलॉकचा VIDEO VIRAL
मुंबई: बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री काजोल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिची बहुचर्चित वेब सिरीज ‘द ट्रायल २’ नुकतीच हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे. या सिरीजमध्ये काजोल एका वकिलाच्या भूमिकेत दिसत आहे.
advertisement
2/7
‘नोयोनिका सेनगुप्ता’ या तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी पहिल्या सिझनप्रमाणेच खूप प्रेम दिलं आहे. पण, या सिरीजमध्ये तिने पुन्हा एकदा ‘नो किसिंग पॉलिसी’ मोडली आहे, ज्यामुळे तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
advertisement
3/7
काजोलने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं, तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितलं होतं की, ती चित्रपटांमध्ये कधीही किसिंग सीन देणार नाही. तिने तिच्या २९ वर्षांच्या करिअरमध्ये कधीच असे सीन केले नाहीत.
advertisement
4/7
पण, ‘द ट्रायल’ या वेब सिरीजच्या पहिल्या सिझनमध्ये तिने तिचा ऑनस्क्रीन पती जीशू सेनगुप्ताला लिपलॉक केलं होतं, ज्यामुळे सगळेच थक्क झाले होते.
advertisement
5/7
आता ‘द ट्रायल २’च्या शेवटच्या एपिसोडमध्ये तिने पुन्हा एकदा जीशूला लिपलॉक केलं आहे. या सीनमध्ये दोघांमध्ये खूपच भावनिक क्षण दाखवण्यात आला आहे, ज्यामुळे तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
6/7
‘द ट्रायल’ या सिरीजमध्ये काजोलने ‘नोयोनिका सेनगुप्ता’ची भूमिका केली आहे. नोयोनिका तिच्या कुटुंबासाठी आणि दोन मुलींसाठी वकिलीचं करिअर सोडते. पण, जेव्हा तिचा नवरा एका घोटाळ्यात अडकतो, तेव्हा तिच्या आयुष्यात एक मोठं वळण येतं आणि ती पुन्हा एकदा वकील बनते.
advertisement
7/7
या दुसऱ्या सिझनमध्ये ती खूप आत्मविश्वासू आणि मोठ्या केसेस हाताळणारी वकील दाखवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
The Trial S2 : तमन्ना भाटियानंतर काजोलनेही तोडली 'नो किसिंग पॉलिसी', ऑनस्क्रीन लिपलॉक करतानाचा VIDEO VIRAL
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल