TRENDING:

साऊथच्या सुपरस्टारशी केलं लग्न, 2 मुलींनंतर डिवोर्स; अभिनेत्री लग्नाआधी होती सचिन पिळगावकरांच्या प्रेमात

Last Updated:
Actress had Fall in Love with Sachin Pilgaonkar : अभिनेत्रीचा नवरा साऊथचा सुपरस्टार, तिला दोन मुली झाल्या. मुलींच्या जन्मानंतर तिनं सुपरस्टारला डिवोर्स दिला. या सगळ्याआधी अभिनेत्री सचिन पिळगावकर यांच्या प्रेमात होती.
advertisement
1/8
साऊथच्या सुपरस्टारशी केलं लग्न, अभिनेत्री लग्नाआधी होती पिळगावकरांच्या प्रेमात
मनोरंजन विश्वात कलाकार आणि त्यांच्या अफेअर्सच्या चर्चा वर्षानुवर्ष सुरू असतात. अशीच एक अभिनेत्री जिनं साऊथच्या सुपरस्टारबरोबर लग्न केलं. लग्नानंतर तिचा सुखाचा संसार सुरू होता. दोन मुली झाल्या. तिच्या दोन्ही मुली आज फिल्म इंडस्ट्रीत अभिनेत्री आहेत. मुलींच्या जन्मानंतर अभिनेत्रीचं साऊथ अभिनेत्याबरोबर बिनसलं. तिनं डिवोर्स घेतला आणि नवं आयुष्य सुरू केलं.
advertisement
2/8
करिअर, लग्न, दोन मुली आणि डिवोर्स हे सगळं होण्याआधी ही अभिनेत्री प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या प्रेमात होती. दोघांनी एकत्र सिनेमातही काम केलं. दोघांचं लग्न ही होणार होतं मात्र ही लव्ह स्टोरी अपूर्णच राहिली. कोण आहे ही अभिनेत्री जी सचिन पिळगावकर यांच्या प्रेमात होती.
advertisement
3/8
सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या हा माझा मार्ग एकला या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांच्या अफेअरबद्दल लिहिलं आहे. an Affair to Remember असा उल्लेख त्यांनी केला आहे.
advertisement
4/8
सचिन पिळगावकर 18 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी गीत गाता चल हा सिनेमा केला. या सिनेमाच्या सेटवर त्यांची ओळख एका अभिनेत्रीशी झाली. दोघांची मैत्री झाली आणि ही मैत्री पुढे प्रेमात रुपांतरित झाली.
advertisement
5/8
सुप्रिया पिळगावकर यांच्याआधी सचिन पिळगावकर यांच्या प्रेमात पडणारी ती अभिनेत्री होती सारिका. अभिनेत्री मुळची मराठी, तिच्या वडिलांचं आडनाव सावंत होतं. तिच्या आई वडिलांचा डिवोर्स झाला आणि सारिका आईबरोबर वेगळी राहू लागली.
advertisement
6/8
सचिन आणि सारिका यांनी एक दोन नाही सात ते आठ सिनेमात एकत्र काम केलं. दोघांची ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन केमिट्री खूप बहारदार होती. पण त्यांचं हे नाव सारिकाच्या आईला मान्य नव्हतं.
advertisement
7/8
सचिन सोबत लग्न झाल्यानंतर सारिकाच्या करिअवर परिणाम होईल असं तिच्या आईला वाटत होतं. त्यामुळे सचिन आणि सारिका यांच्या नात्यात दुरावा आला.
advertisement
8/8
सचिन पिळगावकरांसोबतच नातं तुटल्यानंतर सारिकाचं लग्न साऊथचे सुपरस्टार कमल हासन यांच्याशी झालं. 1988 साली दोघांचं लग्न झालं. दोन मुलींच्या जन्मानंतर दोघांनी 16 वर्षांचा संसार मोडला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
साऊथच्या सुपरस्टारशी केलं लग्न, 2 मुलींनंतर डिवोर्स; अभिनेत्री लग्नाआधी होती सचिन पिळगावकरांच्या प्रेमात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल