TRENDING:

Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री

Last Updated:
Guess Who: हिमाचलच्या डोंगराळ भागात जन्मलेली एक मुलगी आज बॉलिवूडपासून राजकारणापर्यंत स्वतःचा ठसा उमटवत आहे. 15 व्या वर्षी घरातून पळाली होती आणि आज कोट्यवधींची मालकीण आहे. ही अभिनेत्री कोण आहे?
advertisement
1/7
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
हिमाचलच्या डोंगराळ भागात जन्मलेली एक मुलगी आज बॉलिवूडपासून राजकारणापर्यंत स्वतःचा ठसा उमटवत आहे. 15 व्या वर्षी घरातून पळाली होती आणि आज कोट्यवधींची मालकीण आहे. ही अभिनेत्री कोण आहे?
advertisement
2/7
साध्या घरातून आलेली ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीत आली तेव्हा तिच्या कुटुंबाचा शोबिझ जगताशी काहीही संबंध नव्हता. मात्र मेहनत, संघर्ष आणि हट्टाच्या जोरावर तिने यश मिळवलं.
advertisement
3/7
चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सुरुवातीच्या काळात नैराश्य, चुकीच्या लोकांची साथ आणि ड्रग्जच्या व्यसनामुळे तिचे आयुष्य अंधारात गेले होते. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून कंगना रणौत आहे.
advertisement
4/7
एका मुलाखतीत कंगनाने स्वतः कबूल केले की त्या काळात तिला वाटायचं सगळं संपलं आहे. पण एका चांगल्या मित्रामुळे तिला योग आणि राजयोगाची ओळख झाली. स्वामी विवेकानंद यांचे तत्त्वज्ञान अंगीकारत तिने पुन्हा आयुष्याचा मार्ग बदलला.
advertisement
5/7
2006 मध्ये अनुराग बसू यांच्या गँगस्टर या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर वो लम्हे, फॅशन, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, तनु वेड्स मनु, क्वीन, मणिकर्णिका अशा एकापेक्षा एक हिट चित्रपटांमधून तिने स्वतःला सिद्ध केले. क्वीन आणि फॅशनमुळे तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.
advertisement
6/7
आज तिच्याकडे स्वतःची आलिशान मुंबईतील घरं, प्रॉडक्शन हाऊस, आणि आलिशान कार कलेक्शन आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार तिची संपत्ती तब्बल 91 कोटी आहे.
advertisement
7/7
अभिनयाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर तिने राजकारणात प्रवेश केला. गेल्या वर्षी मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून प्रचंड बहुमताने विजय मिळवला. सध्या ती संसदेतून आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल