TRENDING:

लग्नाच्या पाच वर्षानंतर पाहायला मिळणार दिपवीरच्या लग्नाचा तो व्हिडीओ; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Last Updated:
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. दोघेही एकमेकांविषयी खुलेपणाने प्रेम व्यक्त करतात. 2018 मध्ये लग्नगाठ बांधली होती. आता लग्नाच्या पाच वर्षानंतर दोघांच्या लग्नाची एक झलक पाहण्याची संधी चाहत्यांना पहिल्यांदाच मिळणार आहे. कुठे आणि कसं पाहता येणार जाणून घ्या.
advertisement
1/7
लग्नाच्या पाच वर्षानंतर पाहायला मिळणार दिपवीरच्या लग्नाचा 'तो' व्हिडीओ
2018 मध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नानंतर, हे स्टार कपल पहिल्यांदाच 'कॉफी विथ करण सीझन 8' मध्ये एकत्र दिसणार असल्याची माहिती आहे.
advertisement
2/7
करण जोहर लवकरच त्याच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोच्या आठव्या सीझनसह परतणार आहे. दरम्यान, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नानंतर चॅट शोमध्ये पहिल्यांदाच हजेरी लावणार असल्याची माहिती आहे.
advertisement
3/7
याच शोमध्ये दीपवीरच्या लग्नाची झलक पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. आता, 'हिंदुस्तान टाईम्स'च्या वृत्तानुसार दीपवीर शोमध्ये पहिल्यांदाच त्याच्या लग्नाचा व्हिडीओ दाखवला जाणार आहे.
advertisement
4/7
कॉफी विथ करण 8 चा प्रीमियर 26 ऑक्टोबर रोजी OTT प्लॅटफॉर्मवर होईल. आता दिपवीरच्या लग्नाचा व्हिडीओ पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.
advertisement
5/7
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग 2013 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या अॅक्शन-ड्रामा 'गोलियों की रासलीला राम-लीला'च्या सेटवर भेटले होते. शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. काही काळ डेट केल्यानंतर त्यांनी नोव्हेंबर 2018 मध्ये इटलीमध्ये लग्न केले.
advertisement
6/7
लेक कोमो येथील त्यांच्या लग्नाला फक्त त्यांचे जवळचे आणि मित्रमंडळीच हजर होते. दोघांनी पारंपारिक कोकणी हिंदू आणि शीख आनंद कारज नुसार लग्न केले होते.
advertisement
7/7
त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले असले तरी आता जवळपास पाच वर्षांनंतर या जोडप्याच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नातील न पाहिलेले दृश्य पाहायला मिळणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
लग्नाच्या पाच वर्षानंतर पाहायला मिळणार दिपवीरच्या लग्नाचा तो व्हिडीओ; चाहत्यांची उत्सुकता शिगेला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल