TRENDING:

'ज्यांना त्रास सहन करावा लागला...' Nepal मधील हिंसाचार पाहून अभिनेत्री भावूक, नेपाळच्या मराठी सुनेचा मोठा निर्णय

Last Updated:
Nepal political crisis : नेपाळमधील राजकीय उलथापालथीमुळे महाराष्ट्राची लेक आणि नेपाळची सून असलेली अभिनेत्री प्राजक्ता कोळीने एक मोठा निर्णय घेतला आहे.
advertisement
1/6
'ज्यांना त्रास सहन करावा लागला...' नेपाळमधील हिंसाचार पाहून अभिनेत्री भावूक
मुंबई: सध्या नेपाळमध्ये सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीमुळे संपूर्ण जगाचं लक्ष तिकडे लागलं आहे. समाजमाध्यमांवरील बंदी आणि वाढत्या भ्रष्टाचारामुळे तिथल्या तरुणांनी सरकारविरोधात मोठं आंदोलन छेडलं आहे.
advertisement
2/6
परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली शर्मा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, अनेक सेलिब्रिटी या घटनेवर प्रतिक्रिया देत आहेत. आता महाराष्ट्राची लेक आणि नेपाळची सून असलेली अभिनेत्री प्राजक्ता कोळीनेही एक मोठा निर्णय घेतला आहे.
advertisement
3/6
युट्यूबर ते अभिनेत्री आणि आता समाजसेविका म्हणून ओळखली जाणारी प्राजक्ता कोळी सध्या नेपाळमध्ये घडणाऱ्या घटनांवर खूप नाराज आहे. तिने तिथे सुरू असलेली वाढती हिंसा आणि अशांततेमुळे तिची नेपाळची ट्रिप रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
4/6
याबद्दल तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून म्हटलं, “काल नेपाळमध्ये जे घडलं, ते खरोखरच हृदयद्रावक आहे. अशा परिस्थितीत कोणताही उत्सव साजरा करणं किंवा सेलिब्रेट करणं मला योग्य वाटत नाही. ज्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला आहे, त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत.”
advertisement
5/6
आपल्या पोस्टमध्ये प्राजक्ताने पुढे लिहिलं आहे की, “मी तिथे जाऊन सर्वांना भेटण्यासाठी खूप उत्सुक होते, पण ही योग्य वेळ नाही. आशा आहे की लवकरच मी तुम्हा सर्वांना भेटू शकेन.”
advertisement
6/6
ठाण्यातील एका मराठी कुटुंबात जन्माला आलेल्या प्राजक्ताने तिच्या कामातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने रेडिओ जॉकी म्हणून करिअरची सुरुवात केली. नंतर ती पूर्णवेळ युट्यूबर बनली. तिने पर्यावरणविषयक अनेक उपक्रमांसाठी परदेशातही भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'ज्यांना त्रास सहन करावा लागला...' Nepal मधील हिंसाचार पाहून अभिनेत्री भावूक, नेपाळच्या मराठी सुनेचा मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल