TRENDING:

कोकणात आवडीने खातात ही भाजी, अनुष्काचीही आहे फेव्हरेट, अमिताभ यांनी नाव ऐकताच नाक मुरडलं

Last Updated:
Amitabh Bachchan Anushka Sharma KBC Video : कोकणात आवडीने खाणारी एक भाजी अभिनेत्री अनुष्का शर्माची फेव्हरेट आहे. पण या भाजीचं नाव ऐकताच अमिताभ बच्चन यांनी मात्र नाक मुरडलेलं पाहायला मिळालं.
advertisement
1/7
कोकणात आवडीने खातात ही भाजी, अनुष्काचीही आहे फेव्हरेट, अमिताभ यांनी मात्र...
बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करतात याची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. पण या सेलिब्रिटींच्या आहारात मात्र घरगुती पदार्थांचा समावेश असल्याचं पाहायला मिळत आहे. एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणेच बॉलिवूडकरदेखील जेवण करतात. अशातच आता अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मा यांचा एक व्हिडीओ मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. कोकणात आवडीने जी भाजी खातात ती अनुष्काची फेव्हरेट असली तरी बिग बींची मात्र नावडती असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
advertisement
2/7
सोशल मीडियावर केबीसीचा थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा वरुण धवनसोबत अमिताभ बच्चन यांच्या शोमध्ये उपस्थित असलेली दिसत आहे. अनुष्का आणि वरुण 'सुई धागा'च्या प्रमोशनसाठी केबीसीच्या मंचावर आले होते. दरम्यान अमिताभ बच्चन यांनी अनुष्काला तिच्या आवडीच्या पदार्थांविषयी प्रश्न विचारला. यावेळी अनुष्काचं उत्तर ऐकून बिग बी हैरान झाले होते.
advertisement
3/7
'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर अनुष्का शर्माने आपली आवडती भाजी फणसाची भाजी असल्याचे सांगितले. कोकणातील प्रत्येक घरात ही भाजी हमखास केली जाते.
advertisement
4/7
अनुष्का म्हणालेली,"फणस नुसतं खाण्यापेक्षा त्याची भाजी खायला मला आवडते. हिच फणसाची भाजी अत्यंत आवडती भाजी आहे". बिग बींनी पुढे नाक मुरडत त्यांना ही भाजी आवडत नसल्याचे सांगितले.
advertisement
5/7
अनुष्काच्या या उत्तरावर बिग बी हैराण होत म्हणालेले,"फणस, भोपळा, दुधी भोपळ्यासारख्या भाज्या तुम्ही कसं काय खाऊ शकता?". पुढे अनुष्का बिग बींना या तिन्ही भाज्या तिच्या आवडीच्या असल्याचं सांगते. बिग बी पुढे कटहल, कद्दू आणि लौकी या नावांवरुनच ही भाज्यांची नावे आहेत का? असा प्रश्न पडतो.
advertisement
6/7
अनुष्का शर्मा ग्लूटेन मुक्त पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करते. साखर खाणं ती टाळते. दर दोन तासांनी ती काही तरी खाते. आपल्या आहारात अनुष्का ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश करते.
advertisement
7/7
अनुष्काच्या आवडीची भाजी कच्च्या फणसापासून बनवली जाते. या भाजीसाठी फणसाचे छोटे तुकडे करून, कांदा, टोमॅटो, मसाले आणि नारळाचा वापर केला जातो. कच्चा फणस कापताना चिकटपणा टाळण्यासाठी खास पद्धती वापरल्या जातात आणि तयार भाजी झणझणीत लागते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कोकणात आवडीने खातात ही भाजी, अनुष्काचीही आहे फेव्हरेट, अमिताभ यांनी नाव ऐकताच नाक मुरडलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल