TRENDING:

Girija Oak: गिरिजा ओक कशी बनली 'नॅशनल क्रश'! प्रसिद्ध लेखकाने सांगितले 5 सिक्रेट्स, म्हणाले 'पुरुषांची फॅन्टसी...'

Last Updated:
National Sensation Girija Oak : मराठमोळी सुंदरी गिरिजा ओक 'नॅशनल क्रश' कशी बनली? यामागील ५ सिक्रेट्स गुजरातच्या प्रसिद्ध लेखकाने उघड केली आहेत.
advertisement
1/9
गिरिजा ओक कशी बनली 'नॅशनल क्रश'! प्रसिद्ध लेखकाने सांगितले 5 सिक्रेट्स
मुंबई: मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री गिरिजा ओक सध्या इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. 'तारे जमीन पर' आणि शाहरुख खानच्या 'जवान' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली ही ३७ वर्षीय अभिनेत्री सध्या तिच्या निळ्या साडीतील फोटोंमुळे प्रचंड व्हायरल होत आहे.
advertisement
2/9
तिची तुलना थेट हॉलिवूड अभिनेत्री मोनिका बेलुची आणि सिडनी स्वीनी यांच्याशी केली जात आहे. पण मराठमोळी सुंदरी गिरिजा ओक 'नॅशनल क्रश' कशी बनली? यामागील ५ सिक्रेट्स गुजरातचे प्रसिद्ध लेखक जय वसावडा यांनी उघड केली आहेत.
advertisement
3/9
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सन्मानित लेखक जय वसावडा यांनी X वर व्हिडिओ शेअर करत गिरिजा ओकच्या व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण केले आहे. त्यांनी तिच्याबद्दल पाच खुलासे केले आहेत, ज्यावरून ती नॅशनल क्रश होण्यास किती योग्य आहे हे दिसून येते.
advertisement
4/9
<strong>१. ग्रेसफुल साडी लूक:</strong> आजकाल अंग प्रदर्शन करण्याची स्पर्धा असताना, गिरिजा ओक स्लीव्हलेस ब्लाऊजसह साध्या पण तितक्याच ग्रेसफुल साडीत दिसते. हा लूक खूप युनिक आहे. साडीसुद्धा इतकी स्मार्ट पद्धतीने नेसता येते, हे तिने दाखवून दिले.
advertisement
5/9
<strong>२. परफेक्ट कॉम्बो:</strong> गिरिजाच्या लूकमध्ये घरगुती साधेपणा आणि स्मार्टनेस यांचा एक परफेक्ट कॉम्बो आहे, जो पुरुषवर्गाला खूप आकर्षित करतो. तिला पाहून वाटते की ही स्त्री घर, कुटुंब आणि त्याचबरोबर तिचे करिअर असे सगळे काही सांभाळून घेईल.
advertisement
6/9
३. शालीन हास्य: वसावडा यांच्या मते, गिरिजा ओकचे हास्य खूप शालीन आणि मंत्रमुग्ध करणारे आहे. तिचे एक्स्प्रेशन्स खूप चांगले आहेत. तिच्या डोळ्यात एक खोली असून यामुळेच तिचे निरागस सौंदर्य चाहत्यांना भुरळ घालतं.
advertisement
7/9
४. निरागसता आणि परिपक्वता: गिरिजाच्या लूकमध्ये एकीकडे अवखळ मुलीसारखा निरागसपणा दिसतो, तर दुसरीकडे तिच्या वर्तनात परिपक्वता दिसते, ज्यामुळे पुरुषांना अशा मुलींबद्दल आत्मविश्वास मिळतो.
advertisement
8/9
५. १००% स्पष्टता: गिरिजाच्या व्यक्तिमत्त्वात कोणताही गोंधळ दिसत नाही. तिचे व्हिजन स्पष्ट आहे. तिची भाषा आणि उच्चार उत्कृष्ट आहेत. त्यामुळे ती लगेचच सर्वांचे लक्ष वेधून घेते.
advertisement
9/9
वसावडा यांच्या म्हणण्यानुसार, गिरिजा ओक अशा नारीच्या रूपात समोर आली आहेत, जिला पाहून वाटते की, पुरुष सोबत नसला तरी ती पूर्ण घर व्यवस्थित सांभाळून घेईल. ती हुशार, सुशिक्षित आणि संवेदनशील दिसते, ज्यामुळे ती आजच्या काळातील 'आदर्श नारी'च्या प्रतिमेत एकदम फिट बसते. अशा स्त्रिया पुरुषांच्या फॅन्टसीमध्ये असतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Girija Oak: गिरिजा ओक कशी बनली 'नॅशनल क्रश'! प्रसिद्ध लेखकाने सांगितले 5 सिक्रेट्स, म्हणाले 'पुरुषांची फॅन्टसी...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल