TRENDING:

फरमानशी लग्नानंतर 15 दिवसांतच ओक्साबोक्सी रडत सगळ्यांसमोर आली मोनालिसा; केला धक्कादायक खुलासा

Last Updated:
Kumbh Mela Viral Girl Monalisa : फरमान खानशी लग्न केल्यानंतर 15 दिवसांनी मोनालिसा सगळ्यांसमोर आली आणि तिने सगळं सांगून टाकलं आहे.
advertisement
1/7
फरमानशी लग्नानंतर 15 दिवसांतच ओक्साबोक्सी रडत सगळ्यांसमोर आली मोनालिसा; केला धक्कादायक खुलासा
कुंभमेळा व्हायरल गर्ल मोनालिसा भोसलेने 11 मार्च रोजी फरमान खानशी लग्न करून सगळ्यांनाच धक्का दिला. अनेकांनी हा लव्ह जिहाद असल्याचं म्हटलं. तिच्या कुटुंबानेही याला विरोध केला. पण मोनालिसाने फरमानवर आपलं प्रेम असल्याचं सांगितलं. मोनालिसानेच आपल्याला प्रपोज केल्याचं फरमान म्हणाला होता. तसंच त्यांनी केरळमधील एका मंदिरात हिंदू विधीनुसार लग्न केलं, आपण धर्म बदलला नसल्याचं मोनालिसाने सांगितलं.
advertisement
2/7
मोनालिसा आणि फरमान यांच्या लग्नाला आता 15 दिवस झाले आहेत. 15 दिवसांतच मोनालिसा ओक्साबोक्सी रडत सगळ्यांसमोर आली आहे. फरमानशी लग्नानंतर तिने पत्रकार परिषद घेतली होती आणि आता 15 दिवसांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत तिने धक्कादायक खुलासे केले आहेत.
advertisement
3/7
मोनालिसाने दिग्दर्शक सनोज मिश्रावर गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत. तिने 'द डायरी ऑफ मणिपूर' या फिल्मच्या शूटिंगदरम्यान तिच्यासोबत जे काही घडलं ते सांगितलं. ती म्हणाली, "सनोज मिश्रा चांगला माणूस नाही. त्याने सेटवर माझ्याशी अनेक वेळा गैरवर्तन केलं. त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला.
advertisement
4/7
मोनालिसा पुढे म्हणाली, "मी पोलिसात तक्रार दाखल करणार होते.  मी माझ्या घरच्यांना याबाबत सांगितलं. पण कुटुंंबातील कुणीच माझ्या पाठिशी उभं राहिलं नाही. सनोजने त्यांना पैशांचं आमिष दाखवलं. मला त्यांनी पैशांसाठी गप्प केलं, थांबवलं"
advertisement
5/7
"मोनालिसा माझ्याकडे आली नाही, फरमानशी लग्न केलं, हेच त्याला खटकतं. आम्हा दोघांना उघडपणे जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. प्रेम करणं हा गुन्हा आहे का?", असा सवाल तिने उपस्थित केला. माझ्यासोबत अन्याय झाला आहे, मला न्याय हवा आहे, असं ती म्हणाली.
advertisement
6/7
"सनोज मिश्राला राडाच करायचा आहे. यांना एकमेकांशी लढू द्या, मरू द्या. मी राजासारखा बसून बघत राहिन. हेच त्याला हवं आहे. संपूर्ण देशात त्याला दंगली हव्या आहेत", असा आरोप तिने केला आहे.<span style="font-size: 20px;"> </span>
advertisement
7/7
सनोज मिश्रा हा तोच दिग्दर्शक आहे, ज्याने 2025 मध्ये मोनालिसा कुंभमेळ्यात व्हायरल झाली आणि त्याने तिला आपल्या फिल्मसाठी साइन केलं. आता मोनालिसाने सनोजवर असे गंभीर आरोप केले आहेत. हे सगळं सांगताना तिला रडू कोसळलं. यावेळी तिचा नवरा फरमानही तिच्यासोबत होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
फरमानशी लग्नानंतर 15 दिवसांतच ओक्साबोक्सी रडत सगळ्यांसमोर आली मोनालिसा; केला धक्कादायक खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल