'अरुधंती' झाली आणखीनच ग्लॅमरस, मधुराणी गोखले प्रभुलकरचे बेडवरील हॉट फोटो व्हायरल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Madhurani Gokhale Prabhulkar : मधुराणी गोखले प्रभूळकरने तिच्या नव्या बोल्ड लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
advertisement
1/5

‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेने जवळपास पाच वर्ष प्रेक्षकांचे मन जिंकले आणि ३० नोव्हेंबर २०२४ रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेतील नायिका अरुंधती ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभूळकर हिने आपल्या सोज्वळतेने आणि साधेपणाने घराघरात स्थान मिळवलं.
advertisement
2/5
मालिकेतील पारंपरिक साडीतील लूकमध्ये दिसणारी मधुराणी आता एका नव्या अवतारात समोर आली असून तिच्या नव्या रूपाने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
advertisement
3/5
मधुराणीने अलीकडेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक बोल्ड फोटोशूट शेअर केलं आहे, ज्यामध्ये ती पांढऱ्या रंगाच्या सॉफ्ट शर्टमध्ये, मोकळ्या केसांमध्ये आणि न्यूड मेकअप लूकमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. या लूकसोबतच तिने दिलेलं कॅप्शनही लक्ष वेधून घेणारं होतं – “फक्त या उन्हाळ्यानेच का एवढे हॉट असावे?”
advertisement
4/5
या फोटोवर अनेकांनी फायर आणि हार्ट इमोजी कमेंट करत तिचं भरभरून कौतुक केलं. मात्र, याचबरोबर काहींनी तिच्या या बदललेल्या लूकवर टीकाही केली. काही युजर्सनी तिच्या पारंपरिक प्रतिमेशी हा लूक जुळत नाही, असं सांगत नकारात्मक कमेंट्स केल्या. एका युजरने तर तिच्या लूकची खिल्ली उडवत लिहिलं – “आई अशी काय करते?”
advertisement
5/5
मात्र या ट्रोलिंगला चाहत्यांनी तोंड भरून उत्तर दिलं. एका चाहत्याने लिहिलं, “आई काही करू शकत नाही का? स्त्रीचा स्वातंत्र्यावर अधिकार आहे. ही तिची निवड आहे आणि त्याचा आदर केला पाहिजे.” तर आणखी एका नेटकऱ्याने तिला पाठिंबा देत म्हटलं, “तू एक अशी अभिनेत्री आहेस, जिला एखाद्या भूमिकेच्या चौकटीत मर्यादित करता येत नाही.”
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'अरुधंती' झाली आणखीनच ग्लॅमरस, मधुराणी गोखले प्रभुलकरचे बेडवरील हॉट फोटो व्हायरल