TRENDING:

Madhuri Dixit: बॉलिवूडची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री, पण कळत नव्हता पैश्याचा व्यवहार! 'त्या' व्यक्तीने दिले फायनान्सचे धडे

Last Updated:
Madhuri Dixit: माधुरीने नुकताच तिच्या आयुष्यातील एका मोठ्या बदलावर खुलासा केला आहे, तो म्हणजे तिचे फायनान्स मॅनेजमेंट!
advertisement
1/8
बॉलिवूडची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री, पण कळत नव्हता पैश्याचा व्यवहार!
मुंबई: ९० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारी 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित म्हणजे सौंदर्य, अभिनय आणि नृत्याचं भन्नाट कॉम्बिनेशन! तिच्यासोबत काम करणाऱ्या काही अभिनेत्यांसोबत तिचे नाव जोडले जात असताना, तिने अचानक परदेशस्थ, हृदयविकार तज्ज्ञ असलेल्या डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न करून सगळ्यांनाच थक्क केले.
advertisement
2/8
करियर ऐन भरात असताना, बॉलिवूडला रामराम ठोकून माधुरी अमेरिकेला गेली आणि तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले. माधुरीने नुकताच तिच्या आयुष्यातील एका मोठ्या बदलावर खुलासा केला आहे, तो म्हणजे तिचे फायनान्स मॅनेजमेंट!
advertisement
3/8
माधुरीने खूप लहान वयात, साधारण १७ व्या वर्षीच पैसे कमावण्यास सुरुवात केली होती. ९० च्या दशकात ती सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होती, एका चित्रपटासाठी तब्बल १ कोटीपर्यंत फी घ्यायची, अशी चर्चा होती. पण एवढे पैसे कमावूनही, तिने सुरुवातीला कधीच स्वतः पैसे हाताळले नाहीत.
advertisement
4/8
याबद्दल बोलताना ती म्हणाली, "सुरुवातीला मी खूप बिझी असायची, फक्त अभिनयातच माझे लक्ष होते. त्यामुळे माझ्या कमाईचा सर्व हिशोब माझे वडील बघायचे. मला कामाव्यतिरिक्त दुसरी कशाची चिंता नव्हती. खरी गंमत तर लग्नानंतर सुरू झाली!"
advertisement
5/8
माधुरीने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले आणि तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले. डॉ. नेने हे वैद्यकीय क्षेत्रातील असले तरी, त्यांना आर्थिक बाबींचे, इन्व्हेस्टमेंटचे उत्तम ज्ञान आहे आणि याचा फायदा माधुरीला झाला.
advertisement
6/8
माधुरीने हसत-हसत सांगितले, "लग्न झाल्यावर मला पैशांची किंमत आणि त्यांचे व्यवस्थापन खऱ्या अर्थाने कळाले. डॉ. नेने यांनी मला गुंतवणुकीचे धडे दिले. कुठे आणि कसे पैसे गुंतवायचे, कंपन्या कशा समजून घ्यायच्या, हे सर्व त्यांनी मला शिकवले."
advertisement
7/8
एकीकडे लाखो-करोडो कमावणारी अभिनेत्री आणि दुसरीकडे पैशांचे गणित न कळणारी व्यक्ती! लग्नानंतर माधुरीने तिच्या नवऱ्याच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक व्यवहारात खूप प्रगती केली आणि आर्थिक शिस्त शिकली.
advertisement
8/8
आजही ती काम आणि कुटुंबाचा समन्वय उत्तमरित्या साधते. कुटुंबाला प्राधान्य देते आणि वेळेचे नियोजन करते. माधुरीच्या मते, नवऱ्याचा भक्कम पाठिंबा असणे खूप महत्त्वाचे आहे!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Madhuri Dixit: बॉलिवूडची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री, पण कळत नव्हता पैश्याचा व्यवहार! 'त्या' व्यक्तीने दिले फायनान्सचे धडे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल