TRENDING:

माधुरी दीक्षितचं डबल मीनिंग गाणं, 32 वर्षांनीही मुलांसोबत पाहता येणार नाही! फिल्मने मोडलेले बॉलिवूडचे सर्व रेकॉर्ड्स

Last Updated:
Madhuri Dixit Double Meaning Song: सौंदर्यच नाही, तर माधुरीचा अभिनय आणि नृत्य कौशल्यामुळे ती एक परफेक्ट पॅकेज आहे. मात्र १९९३ साली तिचा एक चित्रपट आला, ज्याने या मराठमोळ्या अभिनेत्रीची सोज्वळ प्रतिमा पूर्णपणे मोडून काढली.
advertisement
1/11
माधुरी दीक्षितचं डबल मीनिंग गाणं, 32 वर्षांनीही मुलांसोबत पाहता येणार नाही!
मुंबई: बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री माधुरी दीक्षितचे देशातच नाही, तर जगभरात असंख्य चाहते आहेत. तिने ९०चं दशक अक्षरशः गाजवलं.
advertisement
2/11
सौंदर्यच नाही, तर तिचा अभिनय आणि नृत्य कौशल्यामुळे ती एक परफेक्ट पॅकेज होती. मात्र १९९३ साली तिचा एक चित्रपट आला, ज्याने या मराठमोळ्या अभिनेत्रीची सोज्वळ प्रतिमा पूर्णपणे मोडून काढली.
advertisement
3/11
१९९३ मध्ये प्रदर्शित झालेला सुभाष घई यांचा 'खलनायक' चित्रपट आजही अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या सर्वात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे.
advertisement
4/11
मात्र, या चित्रपटातील आयटम साँग 'चोली के पीछे क्या है' जेव्हा रिलीज झाले, तेव्हा त्याने देशात मोठे सामाजिक वादळ निर्माण केले होते. डबल मिनिंग शब्दांनी भरलेले हे गाणे त्याकाळच्या रूढीवादी विचारांना आव्हान देणारे ठरले होते.
advertisement
5/11
'खलनायक' चित्रपटातील हे पहिले गाणे होते, जे प्रेक्षकांसमोर आणले गेले. या गाण्याचे शब्द ऐकताच लोकांमध्ये प्रचंड रोष पसरला आणि गाण्यावर त्वरित आक्षेप घेण्यात आला.
advertisement
6/11
एका बाजूला लोक विरोध करत असताना, दुसऱ्या बाजूला या गाण्याने इतिहास रचला! रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात या गाण्याच्या एक कोटीहून अधिक कॅसेट विकल्या गेल्या होत्या, जो त्या काळातील एक मोठा विक्रम होता.
advertisement
7/11
माधुरी दीक्षित ही नेहमीच हिंदी सिनेमातील एक उत्कृष्ट नृत्यांगना आणि अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण या गाण्यातील तिच्या बोल्ड अंदाजाने लोकांना धक्का दिला. विशेषतः, चित्रपटात तिच्या व्यक्तिरेखेचे नाव 'गंगा' होते, जे पवित्रतेचे प्रतीक मानले जाते.
advertisement
8/11
'चोली के पीछे क्या है' या गाण्यातील माधुरीचा अंदाज पहिल्यांदाच इतका मादक होता. हा अभिनय तिच्या प्रतिमेपेक्षा वेगळा होता आणि तो समाजाने सहजासहजी स्वीकारला नाही.
advertisement
9/11
गाण्यावरून इतका मोठा वाद निर्माण झाला की, तत्कालीन सरकारी प्रसारमाध्यमे दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओनेही या गाण्यावर बंदी घातली होती.
advertisement
10/11
गाण्यासोबतच माधुरी दीक्षितवरही जोरदार टीका झाली आणि तिच्यावर बंदी घालावी अशी मागणीही करण्यात आली. त्यांच्या नावाने मोठी कंट्रोव्हर्सी झाली.
advertisement
11/11
हा सर्व विरोध आणि वादावादी चित्रपटाच्या रिलीजपर्यंत सुरू होती. मात्र, जेव्हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा संजय दत्तचा राऊडी गुंडा लूक आणि माधुरीच्या नृत्याच्या दिलखेचक अंदाजाने प्रेक्षकांचे मन जिंकले आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला, तेव्हा कुठे हा वाद थांबला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
माधुरी दीक्षितचं डबल मीनिंग गाणं, 32 वर्षांनीही मुलांसोबत पाहता येणार नाही! फिल्मने मोडलेले बॉलिवूडचे सर्व रेकॉर्ड्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल