TRENDING:

दिलीप कुमारचा भाचा असूनही चमकलं नाही नशीब, माधुरी दीक्षितसोबत रोमान्य करणाऱ्या अभिनेत्यावर आली वाईट वेळ

Last Updated:
Bollywood Actor Life : अभिनयाची कला वारसा हक्काने मिळालेले असतानाही, या अभिनेत्याला मात्र आयुष्यभर साईड हिरोचीच भूमिका करावी लागली.
advertisement
1/7
दिलीप कुमारचा भाचा, ज्याने माधुरीसोबत केला रोमान्स; तरीही चमकलं नाही नशीब
मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीचे ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे नाव भारतीय सिनेविश्वात आदराने घेतले जाते. त्यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांचा भाचा म्हणून एका अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. अभिनयाची कला वारसा हक्काने मिळालेली असतानाही, या अभिनेत्याला मात्र आयुष्यभर साईड हिरोचीच भूमिका करावी लागली.
advertisement
2/7
हे दुसरे कोणी नसून, अभिनेते अयूब खान आहेत. अयूब खान यांनी जेव्हा अभिनयाच्या जगात पाऊल ठेवले, तेव्हा दिलीप कुमारचा भाचा म्हणून त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. इंडस्ट्रीतील अनेकांना वाटले होते की, हाच पुढचा सुपरस्टार बनेल. पण नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते.
advertisement
3/7
अयूब खान यांनी आपल्या करिअरची सुरुवात १९९२ मध्ये 'माशूक' या चित्रपटातून केली. यात त्यांच्यासोबत त्या काळातील आघाडीची अभिनेत्री आयशा झुल्का होती.
advertisement
4/7
अयूब खान यांना खरी ओळख मिळाली ती १९९४ मध्ये आलेल्या 'सलामी' या चित्रपटातून. या रोमँटिक-ॲक्शनपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती आणि चित्रपट चांगलाच गाजला होता. पण हा चित्रपट हिट झाल्यानंतर अयूब खानचा दुसरा कोणताही चित्रपट मुख्य अभिनेता म्हणून यशस्वी झाला नाही.
advertisement
5/7
विशेष म्हणजे, १९९७ मध्ये आलेल्या 'मृत्युदंड' या चित्रपटात ते माधुरी दीक्षित सारख्या सुपरस्टार अभिनेत्रीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसले. जी माधुरी दीक्षित अनेक कलाकारांचे करिअर उंचावण्यासाठी ओळखली जाते, तिलाही अयूब खानला सुपरस्टार बनवता आले नाही.
advertisement
6/7
आयुष्यात साईड हिरोची ओळख घेऊन जगणाऱ्या अयूब खान यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या आणि गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, या सर्व चित्रपटांमध्ये ते सहकलाकाराच्या किंवा दुय्यम भूमिकेत दिसले.
advertisement
7/7
'दिल चाहता है', 'कयामत', 'गंगाजल', 'एलओसी-कारगिल', आणि 'अपहरण' यांसारख्या क्रिटिकली अक्लेम्ड आणि यशस्वी चित्रपटांचा भाग बनूनही त्यांची ओळख साईड ॲक्टर म्हणूनच राहिली. पडद्यावर त्यांना भलेही मुख्य भूमिका मिळाली नसेल, पण टीव्ही विश्वात ते खूप सक्रिय आहेत. ते अलीकडेच 'नीरजा- एक नई पहचान' सारख्या टीव्ही शोजमध्ये दिसले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
दिलीप कुमारचा भाचा असूनही चमकलं नाही नशीब, माधुरी दीक्षितसोबत रोमान्य करणाऱ्या अभिनेत्यावर आली वाईट वेळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल