TRENDING:

ईशा डेच्या लग्नात भाव खाऊन गेले समीर चौघुले! त्या कृतीने वेधलं लक्ष; नेमकं काय करत होते? पाहा PHOTO

Last Updated:
Samir Chaughule : अभिनेत्री ईशा डेच्या लग्नात महाराष्ट्राची हास्यजत्रा शोची सगळी टीम पोहोचली होती. अभिनेते समीर चौघुले यांच्या एका कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
advertisement
1/8
ईशा डेच्या लग्नात भाव खाऊन गेले समीर चौघुले! त्या कृतीने वेधलं लक्ष; नेमकं काय करत होते? पाहा PHOTO
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री ईशा डे हिनं अचानक तिच्या लग्नाची बातमी दिली आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. ईशाच्या ग्रहमखाचे फोटो समोर आले आणि ती नेमकं कधी आणि कोणाशी लग्न करतेय याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली होती.
advertisement
2/8
अभिनेत्री ईशा डे हिनं गीतकार अभिषेक खणकरबरोबर लग्न केलं आहे. अभिषेकनं अनेक मालिका आणि सिनेमांसाठी गीतलेखन केलं आहे. त्याला राज्य शासनाचा पुरस्कार देखील मिळाल आहे.
advertisement
3/8
ईशा आणि अभिषेक यांनी लोणावळ्यात लग्न केलं. लग्नाला अत्यंत जवळची व्यक्ती उपस्थित होती. महाराष्ट्राची हास्यजत्रा शोची अनेक मंडळी ईशाच्या लग्नाला गेली होती. प्रियदर्शनी इंदलकर, प्रथमेश शिवलकर, वनिता खरात, समीर चौघुले, सचिन गोस्वामी यांनी ईशाच्या लग्नाला हजेरी लावली होती.
advertisement
4/8
ईशाचं लग्न म्हणजे कल्ला, मजा मस्ती झालीच पाहिजे. हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमने ईशाच्या लग्नात धम्माल केली. अभिनेते समीर चौघुले यांच्या एका कृतीने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधलं.
advertisement
5/8
ईशा आणि अभिषेक यांचं लग्न लागत असताना समीर चौघुले यांनी त्यांच्या फोनमध्ये ईशाचे फोटो काढले. तिच्या लग्नातील तिचे गोड, हळवे क्षण, तिची एक्सप्रेशन्स त्यांनी अचूक टिपले. ईशाने शेअर केलेल्या काही व्हिडीओमध्ये समीर चौघुले ईशाचे फोटो काढताना दिसत आहे.
advertisement
6/8
समीर चौघुले यांनी ईशाचे फोटो एकत्र करून त्याचा व्हिडीओ शेअर करत तिला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समीर चौघुले यांनी शेअर केलेले फोटो हे त्यांनी काढल्याचं बोललं जात आहे.
advertisement
7/8
"माझी लाडकी मैत्रीण इशा काल लग्न बंधनात अडकली..इशा आणि अभिषेक तुम्हा दोघांना भरभरून शुभेच्छा", असं म्हणत समीर चौघुले यांनी ईशा - अभिषेकला शुभेच्छा दिल्यात.
advertisement
8/8
समीर आणि ईशा यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा अनेक स्किट्स एकत्र केलेत. ज्यांनी प्रेक्षकांना पोट धरून हसवलं. अलिकडे आलेल्या गुलकंद या सिनेमातही दोघांनी एकत्र काम केलं. या सिनेमातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ईशा डेच्या लग्नात भाव खाऊन गेले समीर चौघुले! त्या कृतीने वेधलं लक्ष; नेमकं काय करत होते? पाहा PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल