12th फेलमध्ये विक्रांत मेस्सीचं अप्रतिम काम, पण...; महेश मांजरेकर स्पष्टच म्हणाले
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Mahesh Manjrekar : महेश मांजरेकर यांनी नुकतंच एका मुलाखतीत मराठी इंडस्ट्री आणि कलाकारांबाबत आपलं मत मांडलं आहे.
advertisement
1/7

महेश मांजरेकर यांनी नुकतंच एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत मराठी इंडस्ट्री आणि कलाकारांबाबत रोखठोक मत मांडलं आहे.
advertisement
2/7
महेश मांजरेकर म्हणाले,"12th फेल' या चित्रपटात विकांत मेस्सी मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट चांगला चालला. पण त्यामुळे विक्रांत मेस्सीने असं समजू नये की तो माझ्यासाठी चालला".
advertisement
3/7
विक्रांत मेस्सीने अप्रतिम काम केलं आहे. पण त्यानंतर त्याचा आलेला 'आंखों की गुस्ताखियां' हा चित्रपट कोणीच पाहिला नाही. दोन आंधळ्यांचा हा चित्रपट होता. पण तो कोणीही पाहिला नाही, असंही महेश मांजरेकर म्हणाले.
advertisement
4/7
आता कंटेंट चालतोय. कंगना रनौत आणि आर.माधवन हे दोघेही रिटायरमेंट झोनमधील लोक आहेत. पण त्यांच्या 'तनु वेड्स मनु' चित्रपटाचा कंटेंट चालला. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाने पावने दोन कोटींचा बिझनेस केला. सध्या कंटेंट चालतोय हे त्यांना का कळत नाही? असा प्रश्न महेश मांजरेकरांनी उपस्थित केला.
advertisement
5/7
महेश मांजरेकर म्हणाले,"साऊथचे लोक त्यांच्या कलाकारांचे त्यांचे ओरिजनल चित्रपट पाहायला पसंती दर्शवतात. उद्या एक चांगला मराठी चित्रपट बनला आणि तो तमिळ, तेलुगुमध्ये डब केला तरी ते बघतील. त्यांचा आक्षेप फक्त इथल्या कलाकारांवर आहे. पण त्यांना चांगला कंटेंट हवाच आहे".
advertisement
6/7
महेश मांजरेकर पुढे म्हणाले,"आज सचिन खेडेकरचा चित्रपट इतर राज्यांत रिलीज झाला पाहिजे. आपल्याकडे खूप चांगले कलाकार आहेत. दुसऱ्या राज्यातील लोकांना आपले कलाकार माहिती नाहीत. साऊथचे चित्रपट पाहिलेल्यांना वाटतं की सचिन खेडेकर फक्त अशा छोट्या-मोठ्या भूमिका करतो. पण तो एक उत्तम नट आहे हे त्यांना माहितच नाही".
advertisement
7/7
महेश मांजरेकर हे हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीतील एक उत्तम अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. विविध धाटणीच्या दर्जेदार कलाकृतींच्या माध्यमातून ते नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
12th फेलमध्ये विक्रांत मेस्सीचं अप्रतिम काम, पण...; महेश मांजरेकर स्पष्टच म्हणाले