...तर मुंबईतला मराठी माणूस नाहीसा होईल; असं का म्हणाले महेश मांजरेकर?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Mahesh Manjrekar : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत महेश मांजरेकरांनी वक्तव्य केलं आहे. तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे माझा मित्र असल्याचंही ते म्हणाले.
advertisement
1/7

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर म्हणाले,"डिव्हीडंट रूल पॉलिसी ही ब्रिटींशापासून चालल आली आहे. एक अपोझिशन स्ट्राँग असणं खूप गरजेचं आहे. महाभारतापासून आपल्याकडे एक काका-पुतण्याचं वेगळंच समीकरण आहे.
advertisement
2/7
महेश मांजरेकर म्हणाले,"राज ठाकरेचा जेव्हा मी पॉडकास्ट केला तेव्हा मी त्याला पहिला प्रश्न हाच विचारलेला की कोणतं साल उजाडेल तेव्हा मुंबईतला मराठी माणूस नाहीसा होईल. मला हे विचारावसं वाटलं कारण आज जेव्हा मी लोअर परेलला जातो तेव्हा असवस्थ व्हायला होतं. कारण लालबाग-परळ मराठ्यांचा बालेकिल्ला होता. मराठी माणसाला बाहेरच काढलं गेलंय. आता तिथल्या प्लॅटची किंमत 110 कोटींच्या आसपास आहे. मराठी माणूस बदलापूरला गेलाय. बीकेसीमध्ये एक झोपडी दीड कोटींत आहे. त्यामुळे मला वाटतं या दोन्ही भावांनी एकत्र येऊन मराठी माणसाचा मुद्दा हाती घ्यावा.
advertisement
3/7
राज ठाकरे आणि महेश मांजरेकर एकमेकांचे खास मित्र आहेत. याबाबत बोलताना महेश मांजरेकर म्हणाले,"राज ठाकरे माझा मित्र आहे. राजकारणाची मला खूप आवड होती. अशोक चव्हाण आणि मी एकत्र कॉलेजमध्ये होतो. तेव्हापासून मी राजकारण जवळून पाहिलं आहे. तोंड बंद कधी करायचं मला कळत नाही म्हणून मी राजकारणात नाही. राज ठाकरे कायम माझ्या पाठीशी असतो".
advertisement
4/7
महेश मांजरेकर पुढे म्हणाले,"गेल्या काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्या हा विषय मला खूप त्रास देत आहे. शेती या व्यवसायाला काही गॅरंटी नाही मला याचा त्रास होतो. कारण मी 60 रुपयांना घेत असलेला टॉमेटोचे शेतकऱ्याला फक्त पाच रुपये कसे मिळतात? मग काही हजार रुपयांसाठी तो आत्महत्या का करतो?".
advertisement
5/7
महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंवर बायोपिक करण्याबाबतही वक्तव्य केलं. या बायोपिकची स्क्रिप्ट तयार असून 'बुद्धिबळ' असं या बायोपिकचं नाव असेल असं मांजरेकर म्हणाले होते.
advertisement
6/7
महेश मांजरेकर सध्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
advertisement
7/7
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट येत्या 31 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे आता हा मराठी चित्रपट इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
...तर मुंबईतला मराठी माणूस नाहीसा होईल; असं का म्हणाले महेश मांजरेकर?