TRENDING:

Maithili Thakur Fees : 25व्या वर्षी निवडणूक लढवणार, एका शोसाठी घेते लाखो रुपये; मैथिली ठाकूरची संपत्ती किती?

Last Updated:
Maithili Thakur Fees: गायिका मैथिली ठाकुरने राजकारणात एन्ट्री घेतली असून ती निवडणुकीला उभी राहणार आहे. वयाच्या 25व्या वर्षी मैथिली कोट्यवधींची मालकीण आहे. ती एका शोसाठी किती पैसे घेते माहितीये?
advertisement
1/12
25व्या वर्षी निवडणूक लढवणार, एका शोसाठी लाखो रुपये; मैथिली ठाकूरची संपत्ती किती?
सोशल मीडियामुळे एका रात्रीत स्टार झालेली प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर सध्या चर्चेत आहे. मैथिलीनं भाजपचा झेंडा हाती घेतला असून ती यंदा बिहारमधून विधानसभा निवडणूक लढवणार आहे.
advertisement
2/12
मैथिलीने आपल्या मधुर आवाजाने लोकांना भुरळ घालती आता ती राजकारणात आपलं नशीब आजमवणार आहे. मैथिलीनं 14 ऑक्टोबर रोजी भाजपमध्ये प्रवेश केलाय. मैथिलीला अलीनगर मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. 
advertisement
3/12
मैथिली अनेक देश विदेशांत गाण्याचे कार्यक्रम करते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मैथिलीच्या गाण्याचे चाहते आहेत. मनी नाय भाव अन् देवा मला पाव हे मराठी भजन मैथिलीनं गायलं होतं ज्यामुळे तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.
advertisement
4/12
फक्त सोशल मीडिया नाही कर मैथिली अनेक ठिकाणी गाण्याचे कार्यक्रम करते. तुम्ही कधी विचार केला का मैथिली तिच्या एका कार्यक्रमासाठी किती पैसे घेते.
advertisement
5/12
मैथिली ठाकूर फक्त 25 वर्षांची आहे. लहान वयातच तिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सांस्कृतिक राजदूत पुरस्कार' प्रदान केला होता.
advertisement
6/12
मैथिलीचा जन्म बेनीपट्टी या बिहारमधील छोट्या गावात झाला. तिच्या वडिलांचे संगीतवर्ग होते. घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत होती, पण मैथिलीने मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळवले.
advertisement
7/12
मैथिलीचं प्राथमिक शिक्षण गावात झालं त्यानंतर ती दिल्लीला शिफ्ट झाली.  12-13 वर्षांची असताना तिला MCD School मध्ये दाखल करण्यात आले. जिथे तिने दहावी पूर्ण केली.
advertisement
8/12
त्यानंतर तिने बालभवन इंटरनॅशनल स्कूल मधून बारावी पूर्ण केली. नंतर दिल्ली विद्यापीठाच्या आत्माराम सनातन धर्म महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली.
advertisement
9/12
'द रायझिंग स्टार' या रिअॅलिटी शोमुळे मैथिलीला ओळख मिळाली ती देशभरात प्रसिद्ध झाली.  YouTube आणि Instagram वरही ती प्रचंड लोकप्रिय आहे.
advertisement
10/12
मैथिलीला इन्स्टाग्रामवर 6.3 मिलियन लोक फॉलो करतात. तर युट्यूबवर तिचे 5.12 मिलियन सब्सक्राइबर्स आहेत. News18 च्या माहितीनुसार, मैथिली एका शोसाठी 5,00,000 ते 7,00,000 फी घेते.
advertisement
11/12
मैथिली एका महिन्यात सुमारे 12-15 शो करते. त्यामुळे तिची महिन्याची कमाई जवळपास 90 लाख ते 1 कोटी रुपये इतकी आहे. 
advertisement
12/12
इतकंच नाही तर मैथिली सोशल मीडियावरील जाहिरातींमधूनही कमाई करते. ती एका पोस्टसाठी 50 लाख रुपये घेतले.  वयाच्या 25 व्या वर्षी संपत्ती कोटींच्या आकड्यात आहे. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Maithili Thakur Fees : 25व्या वर्षी निवडणूक लढवणार, एका शोसाठी घेते लाखो रुपये; मैथिली ठाकूरची संपत्ती किती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल