फिटनेस फ्रिक मलायका अरोराला मुंबईच्या स्ट्रीट फूडची भूरळ, चीट डेला या ठिकाणी जाऊन खाते मराळमोळे पदार्थ
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Malaika Arora Favorite Street Food :आजही मलायकाला मुंबईतील रस्त्यांवरील खाण्याची खूप आवड आहे. तिने आपल्या आवडीचे स्ट्रीट फूड सांगितले आहेत.
advertisement
1/8
मुंबई: बॉलिवूडची फॅशन आयकॉन आणि अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या ग्लॅमरस आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, एका डान्स शोच्या मंचावर ती आपल्या बालपणीच्या आणि ठाणे शहराच्या आठवणी सांगताना खूप भावूक झाली होती.
advertisement
2/8
ठाण्याच्या हिरवळीत, तलावांच्या शांत वातावरणात वाढलेली मलायका, पण तिचे बालपण संघर्षाने भरलेले होते, याचा खुलासा तिने केला.
advertisement
3/8
मलायकाचा जन्म महाराष्ट्रातील ठाण्यात झाला. जुन्या आणि शांत वस्तीत असलेल्या एका बंगल्यात ती आपल्या कुटुंबासह राहायची. मलायका सांगते, "आमचा बंगला आणि माझी शाळा यांची एक भिंत कॉमन होती."
advertisement
4/8
तिला आजही तिचे ठाण्यातील दिवस आठवतात. ती म्हणते, "काहीवेळा मला ठाण्याच्या दिवसांची खूप आठवण येते. कॉलनीतील मुलांसोबत धावणं, जांभळाच्या झाडांवर चढणं आणि त्या बिनधास्त आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदात जगणं... ते खरंच एक मनमोकळं आयुष्य होतं."
advertisement
5/8
आई-वडिलांच्या विभक्ततेनंतर मलायका, तिची बहीण आणि अभिनेत्री अमृता अरोरा आणि आईसोबत चेंबूर येथे शिफ्ट झाली. ती म्हणाली, "मला आठवतं, आम्ही भाड्याच्या घरात राहायचो. आमचं स्वतःचं घर नव्हतं. मला आठवतंय तिथपासून आम्ही भाड्याच्या घरातच राहिलो आहोत."
advertisement
6/8
ती पुढे म्हणाली, "आम्ही गंमत म्हणून नेहमी म्हणतो की, आम्ही बालपणी माचिसच्या पेटीत राहायचो. ते घर किती लहान होतं, हे मला स्पष्ट आठवतं."
advertisement
7/8
advertisement
8/8
"मला 'बडे मियाँ'चे रोल्स आणि खार येथील 'रणजित'चा वडापाव खूप आवडतो, ठाण्यातील मिसळ पाव, पाणी पुरीही माझ्या आवडीचं आहे. तर चेंबूर येथील झामा शॉपमधील दाल पकवान मला फार आवडतं." असे ती म्हणाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
फिटनेस फ्रिक मलायका अरोराला मुंबईच्या स्ट्रीट फूडची भूरळ, चीट डेला या ठिकाणी जाऊन खाते मराळमोळे पदार्थ